NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणात दुसरी सूत्रधार अटकेत; NTA कडून ‘तज्ज्ञ’ म्हणून नियुक्त महिला व्याख्यातीच निघाली मास्टरमाईंड

या प्रकरणातील दुसरी मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या मनीषा गुरुनाथ मांधरे या महिलेला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.

NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटी प्रकरणात दुसरी सूत्रधार अटकेत; NTA कडून ‘तज्ज्ञ’ म्हणून नियुक्त महिला व्याख्यातीच निघाली मास्टरमाईंड

NEET Paper Leak Case: देशाला हादरवून सोडणाऱ्या NEET UG पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयने (CBI) एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील दुसरी मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या मनीषा गुरुनाथ मांधरे या महिलेला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी मनीषा ही पुण्यातील एका नामांकित संस्थेत वनस्पतीशास्त्र (Botany) विषयाची वरिष्ठ शिक्षिका असून, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) तिला परीक्षेसाठी 'तज्ज्ञ' (Expert) म्हणून नियुक्त केले होते. पी.व्ही. कुलकर्णी यांच्यानंतर ही या प्रकरणातील दुसरी सर्वात मोठी अटक मानली जात आहे.

तज्ज्ञ पदाचा गैरवापर करत निवासस्थानीच दिले पेपर
NTA कडून 'तज्ज्ञ' म्हणून नियुक्ती मिळाल्यामुळे मनीषा मांधरे हिच्याकडे वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र (Zoology) विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा पूर्ण प्रवेश (Access) होता. तपासात असे समोर आले आहे की, एप्रिल 2026 मध्ये पुणे येथील मनीषा वाघमारे यांच्या मदतीने NEET चे संभाव्य उमेदवार एकत्र करण्यात आले होते. मनीषा मांधरे हिने आपल्या निवासस्थानी या विद्यार्थ्यांसाठी विशेष कोचिंग वर्ग घेतले. या वर्गांमध्ये तिने चक्क प्रत्यक्ष परीक्षेत येणारे प्रश्न विद्यार्थ्यांना लिहून दिले आणि ते पाठ्यपुस्तकात चिन्हांकित करून घेतले. 3 मे 2026 रोजी झालेल्या परीक्षेत विचारलेले अनेक प्रश्न तिने आधीच दिलेल्या प्रश्नांशी तंतोतंत जुळणारे असल्याचे तपासात उघड झाले आहे.

देशभरात सीबीआयचे छापे; पुणे-नाशिकमधून 9 जणांना बेड्या
गेल्या 24 तासांत सीबीआयने दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर (नगर) अशा सहा महत्त्वाच्या ठिकाणी मोठी शोधमोहीम राबवली. या कारवाईत अनेक संशयास्पद कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि बँक खात्यांचे तपशील जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यातील पाच जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनीषा मांधरेसह काल अटक केलेल्या दोन आरोपींना पुणे न्यायालयात हजर केल्यानंतर ट्रान्झिट रिमांड मिळवून दिल्लीला हलवण्यात आले आहे.

हेही वाचा – Pune Hospital Bomb : हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचं प्रकरण! पुणे पोलिसांकडून मोठे खुलासे समोर; 'त्या' कारणास्तव बॉम्ब ठेवल्याची माहिती

तपासाची व्याप्ती वाढली
NTA सारख्या जबाबदार संस्थेने नियुक्त केलेली तज्ज्ञच पेपरफुटीमध्ये सहभागी असल्याचे समोर आल्याने खळबळ माजली आहे. सीबीआय आता या रॅकेटमध्ये आणखी किती मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे आणि या बदल्यात किती कोटींची देवाणघेवाण झाली, याचा शोध घेत आहे. जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलमधील डेटाच्या तांत्रिक तपासणीतून अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number