Crime News : धक्कादायक! पत्नीला विष देऊन पतीनेही संपवलं जीवन; सासऱ्यासोबतच्या अनैतिक संबंधांच्या संशयाने एकाच वेळी घरातील चार जणांचे मृत्यू

नालंदा : बिहारच्या नालंदा जिल्ह्यात सासरा आणि सून यांच्यातील कथित अनैतिक संबंधांवरून झालेल्या कौटुंबिक वादामुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली. ही घटना चंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिष्णुपूर गावात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला त्याचे वडील आणि पत्नी यांच्यातील संबंधांबद्दल समजल्यानंतर हा वाद निर्माण झाला. या वादानंतर पत्नी, पती आणि सासरा तसेच दुसरा […]

Crime News : धक्कादायक! पत्नीला विष देऊन पतीनेही संपवलं जीवन; सासऱ्यासोबतच्या अनैतिक संबंधांच्या संशयाने एकाच वेळी घरातील चार जणांचे मृत्यू

नालंदा : बिहारच्या नालंदा जिल्ह्यात सासरा आणि सून यांच्यातील कथित अनैतिक संबंधांवरून झालेल्या कौटुंबिक वादामुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली. ही घटना चंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिष्णुपूर गावात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला त्याचे वडील आणि पत्नी यांच्यातील संबंधांबद्दल समजल्यानंतर हा वाद निर्माण झाला. या वादानंतर पत्नी, पती आणि सासरा तसेच दुसरा मुलगा यांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा : Chhatrapati Sambhajinagar : भटक्या कुत्र्यांची दहशत! तीन वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला; ओळखूही येईना अशी बालकाची अवस्था

हिलसाचे पोलीस उपाधीक्षक (DSP) सुनील कुमार सिंग यांनी सांगितले की, ही घटना प्राथमिकदृष्ट्या त्या कथित अनैतिक संबंधांशी संबंधित असल्याचे दिसून येते. तपासाचा भाग म्हणून घटनाक्रमाची पडताळणी केली जात आहे. कुटुंबातील एका सदस्याने पोलिसांना सांगितले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील इतर सदस्य भाताच्या शेतात काम करत होते. घरातील मुलांनी त्यांना याची सूचना दिली, त्यानंतर नातेवाईक आणि स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. बाधित व्यक्तींना चंडी रेफरल रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पती-पत्नीला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान सासऱ्याचाही मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिसचंद्र तांती (62 वर्षे) याचे सून गौरी देवी (30 वर्षे) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. जेव्हा ही गोष्ट गौरीचा नवरा पुरूषोत्तम कुमारला माहिती पडली तेव्हा त्याला प्रचंड राग आला. यावरून त्याचे वडिलांसोबत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने बायकोला विष पाजले आणि स्वतः देखील प्यायला. मुलगा आणि सुनेला या अवस्थेत पाहून दिलचंद्र याच्या पायाखालची जमीन सरकरली. त्यानंतर त्याने देखील गळफास घेत आत्महत्या केली. तर दिलचंद्र यांचा दुसरा मुलगा रंजीत कुमार याचा देखील मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

माहिती मिळताच चंडी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बिहार शरीफ मॉडेल हॉस्पिटलमध्ये पाठवले. चंडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अखिलेश कुमार झा यांनी दुजोरा दिला की, या कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर एका सदस्याची प्रकृती चिंताजनक आहे. हे प्रकरण कौटुंबिक वादाचे असल्याचे दिसून येत असून, त्याबाबत तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.    

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number