गोंदिया: गोंदिया जिल्हा परिषदेत महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज आला. घराची रेकी करुन दारातून आत पैसे टाकले. या प्रकरणी महिला कर्मचाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या एका कनिष्ठ प्रशासन महिला अधिकाऱ्याने आपल्या विभागातील वरिष्ठ सहायकाविरोधात गोंदिया ग्रामीण पोलिसात गंभीर तक्रार दाखल केली. त्या कर्मचाऱ्याने वारंवार फोन व मेसेज करून तिचा पाठलाग करत त्रास देण्याचा सपाटा लावल्याचे 42 वर्षीय महिला कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका जाहीर; ठाकरे बंधूंचं नागरिकांना निमंत्रण
जिल्हा परिषदेत महिला कर्मचाऱ्याची छेड काढल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी महिला कर्मचाऱ्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही. यानंतर महिला कर्मचाऱ्याने पोलिसात तक्रार केली.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या एका कनिष्ठ प्रशासन महिला अधिकाऱ्याने आपल्या विभागातील वरिष्ठ सहायकाविरोधात गोंदिया ग्रामीण पोलिसात गंभीर तक्रार दाखल केली. त्या कर्मचाऱ्याने वारंवार फोन व मेसेज करून तिचा पाठलाग करत त्रास देण्याचा सपाटा लावल्याचे 42 वर्षीय महिला कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तिच्या तक्रारीवरून आरोपी वरिष्ठ सहायक भूपेंद्र. के. रणदिवे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महिला कर्मचाऱ्याने रणदिवे यांच्या कृत्याची तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती. मात्र वरिष्ठांनी कोणतीही कारवाई न केल्याने हताश झालेल्या महिलेने शेवटी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये मोठी खळबळ माजली असल्याचे दिसून येत आहे.