रबडीच्या दुकानात धक्कादायक प्रकार! सीताफळ पल्पमध्ये आढळल्या अळ्या, FDA ची धडक कारवाई

राज्यभर अन्न व औषध प्रशासनाने धडाकेबाज कारवायांचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर येथे धडक छापे टाकत अनेक भेसळयुक्त आस्थापनांचे परवाने रद्द केले व काहींना नोटिसा बजावल्या.

रबडीच्या दुकानात धक्कादायक प्रकार! सीताफळ पल्पमध्ये आढळल्या अळ्या, FDA ची धडक कारवाई

राज्यभर अन्न व औषध प्रशासनाने धडाकेबाज कारवायांचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर येथे धडक छापे टाकत अनेक भेसळयुक्त आस्थापनांचे परवाने रद्द केले व काहींना नोटिसा बजावल्या. यात आणखी एका कारवाईची भर पडली असून नाशिकमधील सिडकोतील प्रसिद्ध श्री राम रबडीवालाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.

या नामांकित रबडीविक्रीच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. एफडीएच्या छाप्यात दुकानातील सीताफळ पल्पमध्ये अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी संशयित अन्नाचे नमुने जप्त केले आहेत. तपासणीत अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने कठोर पाऊल उचलत श्री राम रबडीवाला यांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याआधी मुंबईतील 17 आस्थापनांचे परवाने एफडीएने रद्द केले होते, तसेच डॉमिनोजच्या 3 आस्थापनांना टाळे देखील लावण्यात आले होते.

हेही वाचा – ऐन नवरात्रौत्सवात सप्तशृंगी गडावर FDA ची धडक कारवाई; तब्बल 5.62 लाख रुपये किमतीची 1,408 किलो मिठाई केली नष्ट

 

 

 

 

 

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number