सोलापुरात मोठी खळबळ! ठाकरे गटाच्या उपनेत्यावर पोलिसांची मोठी कारवाई, नेमकं कारण काय?

सोलापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूरातील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई केली आहे.

सोलापुरात मोठी खळबळ! ठाकरे गटाच्या उपनेत्यावर पोलिसांची मोठी कारवाई, नेमकं कारण काय?
Solapur Sharad Koli Arrested

सोलापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. MPDA कायद्यानुसार शरद कोळी यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. यासंबंधी आठवडाभरापूर्वीच शरद कोळी यांच्यावर MPDA कायद्यानुसार कारवाईचे आदेश जाहीर करण्यात आले होते. कारवाईचे आदेश जाहीर झाल्यापासून शरद कोळी फरार होते.

मात्र काही वेळापूर्वी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कोळी यांना सांगलीतून ताब्यात घेतलं आहे. शरद कोळीवर खंडणी मागणे, धमकी देणे सारखे जवळपास 9 गुन्हे दाखल असल्याने MPDA नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- अमरावती शिक्षण विभाग मतदारसंघात पुणे पॅटर्न राबवणार? शिवसेना-भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता; उमेदवारीवरून भाजपमध्ये सस्पेन्स कायम

शरद विठ्ठल कोळी हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपनेते आहेत. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अर्धनगरी येथील आहे. 2012 मध्ये ते शिवसेनेत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी ‘धाडस’ या सामाजिक संघटनेची स्थापना केली आणि या संघटनेच्या माध्यमातून सोलापूरसह विविध भागांत संघटनात्मक काम केल्याचा दावा त्यांनी केला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर 2022 मध्ये शरद कोळी यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.

त्यानंतर त्यांच्यावर युवासेनेच्या विस्ताराची जबाबदारीही देण्यात आली होती. मात्र आता त्यांच्यावर MPDA कायद्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. MPDA अन्वये कारवाई म्हणजे एखाद्या सराईत गुन्हेगाराला किंवा समाजासाठी घातक ठरणाऱ्या व्यक्तीला विना-जमीन थेट तुरुंगात स्थानबद्ध (Detain) करणे होय. हा महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत कडक कायदा आहे, ज्याचा मुख्य उद्देश समाजात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखणे हा असतो.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number