Junnar Crime: लग्नाचा हट्ट, जमिनीचा वाद अन् संतापाचा स्फोट; मुलानेच वडील-भावाला दगडाने ठेचून संपवलं

पुण्यातील जुन्नर तालुक्यात कौटुंबिक वादातून मुलाने वडील आणि भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

Junnar Crime: लग्नाचा हट्ट, जमिनीचा वाद अन् संतापाचा स्फोट; मुलानेच वडील-भावाला दगडाने ठेचून संपवलं

पुणे: जुन्नर तालुक्यातील पारगाव मढ तर्फे परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. कौटुंबिक वादातून एका मुलाने स्वतःच्या वडिलांची आणि भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बगाडवाडी परिसरात राहणारे जयराम महादू मुकणे आणि त्यांचा मुलगा राजू जयराम मुकणे यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. तपासादरम्यान या प्रकरणामागे कुटुंबातीलच मोठा मुलगा बाबजी जयराम मुकणे असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा: ST Bus Accident In Gujarat: महाराष्ट्रातील बसचा अपघात गुजरातमध्ये! भीषण अपघातात 41 जण जखमी तर 7 जणांचा मृत्यू

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुकणे कुटुंबामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सतत वाद सुरू होते. शेतजमिनीची वाटणी, आर्थिक व्यवहार आणि इतर कौटुंबिक कारणांमुळे वडील आणि मुलामध्ये वारंवार संघर्ष होत असल्याचे सांगितले जाते. याशिवाय स्वतःचे लग्न होत नसल्याबद्दलही आरोपी नाराज असल्याची चर्चा गावात आहे.

घटनेच्या दिवशी घरात पुन्हा एकदा वाद उफाळून आला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र काही वेळातच हा वाद हिंसक वळणावर गेला. संतापाच्या भरात आरोपीने प्रथम मारहाण केली आणि त्यानंतर जवळील जड दगड उचलून वडील आणि भावावर हल्ला चढवला. डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर वार झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला नाही. उलट त्याने संपूर्ण रात्र मृत वडील आणि भावाच्या मृतदेहाजवळच घालवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा: Crime News: गुप्तांगावर लाईटरचे चटके, छातीच्या 7 बरगड्या तुटल्या… ;18 महिन्यांच्या चिमुकल्यावर आईच्या प्रियकराचे अमानुष अत्याचार; निर्दयी आई…

ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद हेच हत्येचे मुख्य कारण असल्याचे दिसून येत असले तरी पोलिस इतर शक्यतांचाही तपास करत आहेत.

रक्ताच्या नात्यांनाच काळिमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. एका घरातील तीन सदस्यांच्या आयुष्याला या घटनेने वेगळेच वळण दिले असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number