Friday, July 11, 2025 11:28:20 PM

मुख्याध्यापकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

शाळेतील भिंत पाडल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 4 जुलै रोजी माटोरा येथील प्रशांत विद्यालयात घडला.

मुख्याध्यापकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

सुरज बागडे. प्रतिनिधी. भंडारा: शाळेतील भिंत पाडल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 4 जुलै रोजी माटोरा येथील प्रशांत विद्यालयात घडला. या घटनेमुळे पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळेत धाव घेतली. तसेच, कारधा पोलिसात मुख्याध्यापक प्रदीप गेडाम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थ्याचे नाव कुलदीप नामदेव डोमळे (वय: 14, रा. माटोरा) असे आहे. 

हेही वाचा: पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये कोयता अन् हातोड्याने मारहाण

नेमकं प्रकरण काय?

प्रशांत विद्यालयातील कुलदीप नावाच्या विद्यार्थ्याने लाथ मारून शाळेतील विटांची भिंत तोडली. या घटनेमुळे प्रशांत विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप गेडाम याने विद्यार्थ्याला हातावर, पाठीवर आणि पायावर बेदम मारहाण केली. या मारहाणीत पीडितेला गंभीर दुखापत झाली. विद्यार्थ्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या. त्यामुळे, पीडित विद्यार्थ्याला तात्काळ रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे. 


सम्बन्धित सामग्री