नवी मुंबई : पनवेलमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्यातून तरूणीसोबत हा प्रकार झाला आहे.
पनवेलमध्ये पोलिस स्टेशनच्या हद्दीत तरूणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. 10 दिवसानंतर पीडित तरुणीने या प्रकरणाची तक्रार दाखल केली असून 42 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणातील आरोपीला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा : डोंगराला लागलेल्या वणव्यात एकाचा होरपळून मृत्यू
नेमकं काय घडलं?
तरूणी सकाळी महाविद्यालयात जायला निघाली असता आरोपीने पुढे बसस्टॉप वर सोडतो असे म्हणत विद्यार्थिनीला आपल्या इको गाडीत बसवले. आरोपी आपली इको गाडी बस स्टॉपवर नेण्याऐवजी एका शेतात घेऊन गेला. इको गाडीमध्येच नराधम आरोपीने विद्यार्थिनीसोबत बलात्कार केला. या कृत्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने 10 दिवसांनी सदर बाब कुटुंबियांना सांगितली. कुटुंबियांच्या तक्रारीवरून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 42 वर्षीय नराधम आरोपी अमोल पदरथ याला पनवेल पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आता नराधम आरोपीला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.