सातारा : साताऱ्यामधील पाटण तालुक्यातील अंब्रुळकरवाडी- भोसगांव येथे डोंगराला लागलेल्या वणव्यात एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आंब्याची बाग वाचवताना होरपळून मृत्यू झाला आहे.
अंब्रुळकरवाडी- भोसगांव येथे डोंगराला लागेल्या वणव्यात एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला आहे. आंब्याची बाग वाचवताना ही घटना घडली आहे. तुकाराम सिताराम सावंत असं मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते 64 वयाचे होते. आग विझविण्यासाठी गेलेले असताना त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या वणव्यात 100 ते 150 झाडांची आंब्याची बाग देखील जळून खाक झाली आहेत.
हेही वाचा : नितेश राणेंच्या भूमिकेला नाशिकच्या खाटीक समाजाचा विरोध
वाल्मिक पठारावरील जौंजाळवाडी जवळ वणवा लागला. उन्हाळ्याच्या तडाख्याने आगीने भडकून रौद्ररूप धारण केले. या आगीत तुकाराम सावंत यांची आंब्याची बाग जळायला लागली. आग विझविण्याच्या नादात आगीने वेढा दिलेला लक्षात न आल्याने तुकाराम सावंत यांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला.
सातारा जिलह्यातील पाटण तालुक्यामधील अंब्रुळकरवाडी- भोसगांव येथे आगीची घटना घडली. वाल्मिक पठारावरील जौंजाळवाडी जवळ वणवा लागला. या आगीने रौद्ररूप धारण केले. यात तुकाराम सावंत यांची आंब्याची बाग जळायला सुरूवात झाली. या बागेची रक्षा करण्यासाठी केलेल्या सावंतांना आगीने घेरले. आग विझवण्याच्या नादामध्ये आगीने दिलेला वेढा त्यांच्या लक्षात आला नाही. त्यातच सावंतांचा दुर्दैवी मृत्यू झाला.