पुण्यात गुइलेन बेरी सिंड्रोमचे रूग्ण वाढले

गुइलेन बॅरी सिंड्रोमचा अर्थात (जीबीएस) धोका पुणे जिल्ह्यात वाढला आहे.

पुण्यात गुइलेन बेरी सिंड्रोमचे रूग्ण वाढले

पुणे : गुइलेन बॅरी सिंड्रोमचा अर्थात (जीबीएस) धोका पुणे जिल्ह्यात वाढला आहे. शनिवारी पुण्यात सहा नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 73 वर पोहोचली आहे. शहरी भागाच्या तुलनेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 44 रुग्णांचा समावेश आहे. तर पुणे शहरात 11 आणि पिंपरी-चिंचवड शहरात 15 रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच विभागाची बैठक घेत प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

काय आहे गुइलेन बॅरे सिंड्रोम?

गुइलेन बॅरी सिंड्रोम म्हणजेच जीबीएस सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा एक प्रकार आहे.  यामुळे शरीरातील स्नायु कमकुवत होतात, स्नायूंची संवेदना कमी होतात. याची सुरुवात सामान्य लक्षणांनी होते. जसे की, हातांना मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे. बहुतांश लोक या आजारातून बरे होतात. बरे होण्याचा कालावधी रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असतो.

हेही वाचा : महाराष्ट्रातील 48 पोलिसांना राष्ट्रपती पदक जाहीर

या नव्या आजाराने पुण्यातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.  पुण्यात GBSचे रुग्ण आणि परिस्थितीचा अहवाल तयार करून उपाययोजनांसाठी काम केले जाणार असून केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार आहे.

शहरात पसरलेल्या या दुर्मिळ आजाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थेच्या सहभागाने शीघ्रकृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांनी या आजाराला न घाबरता लक्षणे दिसताच संबंधितांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं.

पतीने पत्नीसोबत केला धक्कादायक प्रकार

पुण्यात पतीने पत्नीची हत्या केली आहे.

पतीने पत्नीसोबत केला धक्कादायक प्रकार

पुणे : पुण्यात पतीने पत्नीची हत्या केली आहे. या हत्येचा व्हिडिओ पतीने बनवला आहे. शिलाई मशीनच्या कात्रीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

हेही वाचा : लातूरमध्ये 4 हजार 200 कोंबड्यांच्या पिल्लांचा मृत्यू

पुण्यातील खराडीमध्ये पतीने शिलाई मशीनच्या कात्रीनं पत्नीची निघृण हत्या केली आहे. ही हत्या करताना पतीने त्याचा व्हिडिओ शूट केला आहे. मुलासमोरच त्याने आपल्या पत्नी हत्या केली आहे. या हत्येचा संपूर्ण तपशील जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या हाती लागला आहे. शिवदास गीते असं हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. हा व्यक्ती 38 वर्षाचा आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

घरगुती भांडणं आणि कोर्टाच्या स्टेनो परीक्षेचा अभ्यास करण्याच्या कारणावरून शिवदास गीते आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला होता. पत्नीची हत्या करून आरोपी शिवदास गीते खराडी पोलीस स्टेशनला सकाळी आठ वाजता हजर राहिला. तर मध्यरात्री तीन-साडेतीन वाजल्यापासून दोघांची भांडणं सुरू झाली होती.  

 

अजित पवारांनी घेतली बाबा आढावांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महायुतीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतली.

अजित पवारांनी घेतली बाबा आढावांची भेट

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महायुतीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची भेट घेतली.

ईव्हीएम संदर्भात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी काही आक्षेप घेतले आहेत. त्यांनी ईव्हीएमला विरोध करण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. बाबा आढाव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला.  आढाव यांनी उपोषण मागे घ्यावे आणि प्रकृतीची काळजी घ्यावी, आवश्यक ते उपचार करुन घ्यावे; अशी विनंती अजित पवार यांनी केली.

याआधी राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान झाले. ईव्हीएमद्वारे कोट्यवधी मते नोंदवली गेली. यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली. निकाल जाहीर झाला. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमला विरोध सुरू केला. विशेष म्हणजे ईव्हीएमद्वारे मते मिळवून विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी स्वतःच्या निकालाविषयी शंका व्यक्त केली नाही. पण महाविकास आघाडीने त्यांच्या पराभूत झालेल्या उमेदवारांच्या मतदारसंघांमध्ये ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्या. यानंतर बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधात उपोषण सुरू केले. उपोषणाचा तिसरा दिवस आहे. बाबा आढाव यांची तब्येत खालावत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बाबा आढाव यांची भेट घेतली.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ झाला. ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले, त्यात काहीतरी घोटाळा झाला, असे बाबा आढाव म्हणाले. मतदानात काहीतरी गडबड असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. बाबा आढाव यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर अजित पवारांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. निवडणूक प्रक्रिया हा निवडणूक आयोगाचा विषय आहे. ही प्रक्रिया राबवण्याचे सर्वाधिकार त्यांच्याकडे आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. जनतेचा एकदा कौल आला की तो मान्य केला पाहिजे. दिल्ली सरकारने नागरिकांना अनेक मोफत योजना दिल्या. इतर अनेक राज्यांनीही मोफत योजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली. जनतेनं कोणावर किती विश्वास ठेवावा आणि कसं मतदान करायचं याचं त्यांना स्वातंत्र्य आहे; असे अजित पवार म्हणाले. लोकसभेला ईव्हीएम चांगलं होतं. विरोधकांची तक्रार नव्हती; याकडेही अजित पवारांनी बाबा आढाव आणि त्यांच्या समर्थकांचे लक्ष वेधले. ईव्हीएम संदर्भात न्यायालयाचा निर्णय मान्य करावाच लागेल; असेही अजित पवार म्हणाले.

कोण आहेत बाबा आढाव ?

बाबा आढाव हे 1970 मध्ये पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते. ते तत्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते. रिक्षा पंचायतीचे काम करत होते. त्यांनी 'एक गाव एक पाणवठा' ही योजना राबवली होती. ते 94 वर्षांचे आहेत. 

चंद्रकांत पाटलांसह कोथरुडमधील ३ उमेदवारांना नोटीस

भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांच्यासह कोथरुड विधानसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.

चंद्रकांत पाटलांसह कोथरुडमधील ३ उमेदवारांना नोटीस

पुणे : भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांच्यासह कोथरुड विधानसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. जाहीर केलेल्या दैनंदिन खर्चात तफावत आढळल्यामुळे आयोगाने नोटीस बजावली आहे. उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीने या प्रकरणात समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही तर आयोग नियमानुसार पुढील कारवाई करण्याबाबत निर्णय घेईल. 

पुण्यात १५० पिस्तुल परवाने रद्द

पुणे शहर पोलिसांनी १५० पिस्तुल परवाने रद्द केले.

पुण्यात १५० पिस्तुल परवाने रद्द

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी शस्त्र परवान्यांच्या तपासणीचे काम हाती घेतले आहे. या कामाची सुरुवात केल्यानंतर पुणे शहर पोलिसांनी १५० पिस्तुल परवाने रद्द केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात पिस्तुल परवाने रद्द करण्याची ही पुणे शहरातील पहिलीच वेळ आहे. परवाने रद्द करुन शस्त्र सरकारजमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पुण्यात शंभरी ओलांडलेले पाच हजारांपेक्षा जास्त मतदार

पुणे जिल्ह्यात शंभरी ओलांडलेले पाच हजारांपेक्षा जास्त मतदार आहेत. यात महिला मतदारांची संख्या जास्त आहे.

पुण्यात शंभरी ओलांडलेले पाच हजारांपेक्षा जास्त मतदार

पुणे : पुणे जिल्ह्यात शंभरी ओलांडलेले पाच हजारांपेक्षा जास्त मतदार आहेत. यात महिला मतदारांची संख्या जास्त आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण पाच हजार २३१ शंभरी ओलांडलेले मतदार आहेत. यात शंभरी ओलांडलेल्या पुरुष मतदारांची संख्या दोन हजार ५४६ आणि महिला मतदारांची संख्या दोन हजार ६८४ एवढी आहे. 

पुरुषांच्या तुलनेत शंभरी ओलांडलेल्या महिला मतदारांची संख्या १३८ ने जास्त आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, चिंचवड आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात शंभरी ओलांडलेल्या पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५६५ तर मावळ विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ८१ शंभरी ओलांडलेले मतदार आहेत. 

निवडणूक आयोगाने ८५ पेक्षा जास्त वयाच्या मतदारांना घरातूनच मतदान करण्याचा पर्याय दिला होता. त्यासाठी एक हजार ९२५ मतदार पात्र ठरले आहेत. त्यांना घरातून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

  1. पुणे जिल्हा
  2. एकूण विधानसभा मतदारसंघ – २१
  3. एकूण मतदार – ८८ लाख ४९ हजार ५९०
  4. एकूण पुरुष मतदार – ४५ लाख ७९ हजार २१६
  5. एकूण महिला मतदार – ४२ लाख ४९ हजार ५६९
  6. एकूण तृतीयपंथी मतदार – ८०५
  7. शंभरी ओलांडलेले एकूण मतदार – ५ हजार २३१

शंभरी ओलांडलेले पुरुष मतदार  – २ हजार ५४६
शंभरी ओलांडलेले महिला मतदार – २ हजार ६८४

पावसामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द

मुसळधार पाऊस पडल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारचा नियोजीत पुणे दौरा रद्द झाला

पावसामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द

पुणे : मुसळधार पाऊस पडल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारचा नियोजीत पुणे दौरा रद्द झाला आहे. पंतप्रधान मोदी गुरुवारी पुण्यात २२ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण करणार होते. यात तीन परम रुद्र महासंगणकांचे लोकार्पण, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील दहा हजार ४०० कोटी रुपयांच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन आणि लोकार्पण तसेच सोलापूर विमानतळाचे उद्घाटन आणि बिडकीन औद्योगिक क्षेत्राचे लोकार्पण होणार होते. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची नवी तारीख काय असेल हे लवकरच जाहीर केले जाईल, असे सूत्रांकडून समजते. 

पंतप्रधान मोदी गुरुवारी पुण्यात येणार हे आधीच जाहीर झाले होते. पण बुधवारी पुण्याला पावसाने झोडपले. पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेणार होते, त्या ठिकाणी तुफान पावसामुळे प्रचंड चिखल झाला. तसेच पावसामुळे पुण्यातले जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाला आहे.

पुण्यात महापालिकेचा ट्रक खड्ड्यात

सांडपाणी वाहिनीच्या दुरूस्तीसाठी आलेला ट्रक रस्ता खचल्यामुळे क्षणार्धात सुमारे २५ फूट खोल खड्ड्यात पडला.

पुण्यात महापालिकेचा ट्रक खड्ड्यात

पुणे : सांडपाणी वाहिनीच्या दुरूस्तीसाठी आलेला ट्रक रस्ता खचल्यामुळे क्षणार्धात सुमारे २५ फूट खोल खड्ड्यात पडला. चालक प्रसंगावधान राखून वेगाने टॅकमधून बाहेर पडल्यामुळे सुखरुप आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. घटनेचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होत आहे. प्रशासनाने क्रेनच्या मदतीने खड्ड्यातून ट्रक बाहेर काढला आहे. या निमित्ताने रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. दुर्घटनेची चौकशी होणार आहे. 

पुण्यातील प्रमुख रस्ते बंद

गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद

पुण्यातील प्रमुख रस्ते बंद

पुणे : गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता बंद असेल. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

पुण्यात सीएनजी महागला

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीने सीएनजीच्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) दरात प्रति किलो ९० पैशांची वाढ केली.

पुण्यात सीएनजी महागला

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीने सीएनजीच्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) दरात प्रति किलो ९० पैशांची वाढ केली. यामुळे पुण्यात प्रति किलो सीएनजी ८५ रुपये ९० पैसे या दराने उपलब्ध आहे. संपूर्ण पुणे महानगर क्षेत्रात सीएनजी प्रति किलो सीएनजी ८५ रुपये ९० पैसे या दराने मिळेल. घरगुती वापराच्या पीएनजीच्या (पाइप्ड नॅचरल गॅस) दरात बदल केलेला नाही. यामुळे पीएनजी प्रति किलो ४९ रुपये ९० पैसे या दराने मिळेल.

सिंहगड रस्त्यावर कोयत्याने तरुणावर हल्ला

पुण्यात सिंहगड रस्त्यावर कोयत्याने तरुणावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

सिंहगड रस्त्यावर कोयत्याने तरुणावर हल्ला

पुणे : मे महिन्यात पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरात एकमेकांकडे बघितल्यावरून भांडण झाले होते.त्याचवेळी एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात त्याचा मृत्यू देखील झाला होता. श्रीनिवास वतसलवार असे या तरुणाचे नाव होते. ज्या तरुणांनी श्रीनिवास वर हल्ला केला त्यापैकी सागर चव्हाण एक होता. बुधवारी पुण्यातील किरकटवाडी भागात सागर चव्हाण याला एका मित्राने बोलवून घेतलेले असताना त्याच्यावरच वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये सागर चव्हाण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
 

पुण्यात बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा पर्दाफाश

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात घातपाती कारवायांच्या संभाव्य घटनांच्या अनुषंगाने पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

पुण्यात बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा पर्दाफाश

पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात घातपाती कारवायांच्या संभाव्य घटनांच्या अनुषंगाने पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील कोंढवा भागात मोठी कारवाई केली आहे. या भागात बेकायदेशीर पद्धतीने चालवल्या जात असलेल्या ‘बनावट टेलिफोन एक्सचेंज’चा पर्दाफाश करण्यात आला आहे. या ठिकाणावरुन एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. एटीएसच्या पथकाने तब्बल ३ हजार ७८८ सीमकार्डसह संत सीम बॉक्स, वायफाय आणि सीमबॉक्स चालवण्याकरिता लागणाऱ्या अँटिना तसेच लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला आहे.  

पुण्यात तरुणीची हत्या, शरीराचे केले तुकडे

खराडीजवळ नदीपात्रात तरुणीचे धड आढळले.

पुण्यात तरुणीची हत्या, शरीराचे केले तुकडे

पुणे : खराडीजवळ नदीपात्रात तरुणीचे धड आढळले. पोलिसांनी हे धड जप्त करुन त्याची तज्ज्ञांच्या मदतीने वैद्यकीय तपासणी केली. तज्ज्ञांच्या मते १८ ते ३० वयोगाटातील तरुणीची हत्या करण्यात आली आहे. या तरुणीचे हात – पाय कापून त्यांची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्यात आली आहे. पोलीस मृत तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

आरोपी सूद आणि मित्तलला न्यायालयीन कोठडी

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात आरोपी आदित्य सूद आणि आशिष मित्तल या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली

आरोपी सूद आणि मित्तलला न्यायालयीन कोठडी

पुणे : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात आरोपी आदित्य सूद आणि आशिष मित्तल या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. पुरावे नष्ट करणे, सरकारी दस्तऐवजात फेरफार करणे, न्यायालयीन प्रक्रियेत बेकायदा हस्तक्षेप, आरोपीच्या सुटकेसाठी बेकायदा आर्थिक व्यवहार करणे अशा स्वरुपाचे गंभीर आरोप आरोपींवर आहेत. 

बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरण्यावर बंदी

बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरण्यावर बंदी घालण्याबाबत पुणे पोलिसांनी परिपत्रक काढले.

बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरण्यावर बंदी

पुणे : बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरण्यावर बंदी घालण्याबाबत पुणे पोलिसांनी परिपत्रक काढले. लेझर बीम लाईट आकाशात सोडल्यास हवाई वाहतुकीला अडथळे निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पुढील ६० दिवसांसाठी ही बंदी घातली आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या परिपत्रकामुळे दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात बीम लाईट आणि लेझर बीम लाईट यांचा वापर करता येणार नाही. 

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले

पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले.

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले

पुणे : पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती स्थिर आहे. हेलिकॉप्टरच्या चालकाला रुग्णालयात दाखल केले आहे.

पाऊस पडत असताना पुण्याच्या आकाशातून जात असलेले खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर पौड परिसरात कोसळले. हे हेलिकॉप्टर मुंबई येथून विजयवाडाच्या दिशेने जात होते. हेलिकॉप्टरने मुंबईतील जुहू येथून उड्डाण केले होते. पौड परिसरात हेलिकॉप्टर कोसळले तेव्हा मोठा आवाज झाला. आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना तातडीने बोलावले. स्थानिक आणि पोलिसांनी मदतकार्य केले.

अगरवाल दांपत्य आणि इतर चौघांचे जामीन फेटाळले

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्याआधी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील सर्व आरोपींचे जामीन फेटाळण्यात आले

अगरवाल दांपत्य आणि इतर चौघांचे जामीन फेटाळले

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्याआधी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील सर्व आरोपींचे जामीन अर्ज विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी फेटाळले. सध्या सर्व आरोपी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

'या' सहा जणांचे जामीन फेटाळले

  1. अल्पवयीन आरोपीचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल
  2. अल्पवयीन आरोपीची आई शिवानी विशाल अगरवाल
  3. ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे
  4. आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर
  5. अशफाक मकानदार 
  6. अमर गायकवाड

पुण्याला झिकाचा धोका

पुणे शहरात झिकाचा धोका वाढला आहे. आतापर्यंत एकूण ६६ जणांना झिकाची लागण झाली आहे.

पुण्याला झिकाचा धोका

पुणे : पुणे शहरात झिकाचा धोका वाढला आहे. आतापर्यंत एकूण ६६ जणांना झिकाची लागण झाली आहे. पुण्यातील झिकाच्या रुग्णांमध्ये २६ गरोदर महिलांचा समावेश आहे. पुण्यातील आरोग्य यंत्रणेला दक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. झिका रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुण्याला पावसाने झोडपले

पुण्याला पावसाने झोडपले. बुधवार रात्रीपासूनच पडत असलेल्या पावसामुळे पुण्याची दाणादाण उडाली आहे. पावसामुळे पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले. नागरिकांची पंचाईत झाली.

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : पुण्याला पावसाने झोडपले. बुधवार रात्रीपासूनच पडत असलेल्या पावसामुळे पुण्याची दाणादाण उडाली आहे. पावसामुळे पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले. नागरिकांची पंचाईत झाली. पोलीस तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान मदतकार्यात गुंतले आहेत. नागरिकांना सखल भागांतून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. भिडे पुलाजवळ डेक्कन जिमखाना परिसरात विजेचा धक्का लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला. मागील २४ तासांत ४५ ठिकाणी झाडे पडली. ताम्हिणी परिसरात चोवीस तासांत ५५६ मिलीमीटर पाऊस झाला. शिरगाव परिसरातही ४८४ मिमी, आंबवणे येथे ४४० मिमी, माले ३०२ मिमी, मुळशी ३०५ मिमी, दावडी ३६७ मिमी पावसाची नोंद झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांना सुटी देण्यात आली आहे. 

पुणे शहरात चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात आला आहे. वारजे परिसरातील निवडक सोसायट्यांमध्ये तसेच सिहंगड रस्त्यावरील काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. रजपूत वीटभट्टीजवळ, गंजपेठ, चांदतारा चौक, शिवाजीनगर भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. भवानी पेठेतील गुळ आळी, वटेश्वर भुवन येथे मोठे झाड पडल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद. झाडाखाली काही वाहने अडकली आहेत. वडगाव बुद्रूक, महापालिका मैदान येथे भिंत कोसळली. हिंगणे खुर्द, साई नगर येथे डोंगरमाथ्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने घरात पाणी शिरले. वडगाव शेरीतील आनंदनगर बस थांब्याजवळ एका वाहनावर झाड कोसळले. भवानी पेठेत वाड्याची भिंत पडली. कोरेगाव पार्क, बर्निंग घाटाजवळ भिंत पडली. बावधन परिसरात पाणी जमा झाल्याने वाहने अडकली. पुलाची वाडी परिसरात वस्तीत पाणी शिरले. 

 पावसामुळे मोसे खोऱ्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरड कोसळणे, बंगल्यांची पडझड, रस्ते वाहतूक मंदावणे, वीज पुरवठा खंडीत होणे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. लवासा सिटीचा पायथा ते पुण्याहून लवासा मध्ये प्रवेश करतानाची कमान या दरम्यानच्या घाट रस्त्यात तीन ठिकाणी दरड कोसळली. मुख्य रस्त्यावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर माती व राडारोडा जमा झाला. लवासा ते वरसगाव या रस्त्यावरही काही ठिकाणी भेगा पडल्या असून रस्ता खचला आहे. या रस्त्यावर पडळघर येथील स्मशानभूमीलगतच्या रस्त्यावर दरड कोसळली आहे. तेथील रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. आडमाळ परिसरात विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. 

पुण्यात मुसळधार पाऊस
सखल भागात पाणी साचले
सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
पुण्यातील शाळा, कार्यालयांना सुटी

 

स्टंट करत रील केल्याप्रकरणी गुन्हा

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात स्टंट करणाऱ्या तरुणीवर गुन्हा नोंदवण्यात आला

स्टंट करत रील केल्याप्रकरणी गुन्हा

पुणे : पडक्या इमारतीच्या छतावर एक मुलगी मुलाच्या हाताला लटकून स्टंट करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात स्टंट करणाऱ्या तरुणीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

सार्वजनिक ठिकाणी स्टंटचा व्हिडीओ करून इतरांना स्टंटचे रील करण्यासाठी प्रोत्साहन देणे ही गंभीर बाब आहे. रील करणाऱ्यांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जाण्याची शक्यता कमी आहे. यामुळे रीलच्या नादात अपघात होण्याची, जीवाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे; अशी कारणे देत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात व्हायरल व्हिडीओत स्टंट करताना दिसत असलेल्या मुलीचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. 

विशाल आणि सुरेंद्रकुमारला पोलीस कोठडी

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या दोन आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

विशाल आणि सुरेंद्रकुमारला पोलीस कोठडी

पुणे : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या दोन आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल या दोघांना न्यायालयाने ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अपघात प्रकरणात बाल हक्क न्यायमंडळाने अल्पवयीन आरोपीला ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश आधीच दिले आहेत. 

सुरेंद्रकुमार अगरवालला पोलीस कोठडी

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात सुरेंद्रकुमार अगरवालला न्यायालयाने २८ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

सुरेंद्रकुमार अगरवालला पोलीस कोठडी

पुणे : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात सुरेंद्रकुमार अगरवालला न्यायालयाने २८ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा सुरेंद्रकुमारवर आरोप आहे. याआधी याच प्रकरणात न्यायालयाने विशाल अगरवाल आणि इतर पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, नितेश शेवाणी आणि जयेश बोणकर या पाच आरोपींनी जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला आहे.

आरोपी – वेदांत अगरवाल – वय १७ वर्षे ८ महिने – जामीन रद्द, ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी
आरोपी – विशाल अगरवाल, वेदांतचे वडील – १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आरोपी – कोझी हॉटेलचा मालक प्रल्हाद भुतडा – १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आरोपी – कोझी हॉटेलचा व्यवस्थापक सचिन काटकर – १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आरोपी – ब्लॅक बारचा मालक संदीप सांगळे – १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आरोपी – कर्मचारी नितेश शेवाणी – १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आरोपी – कर्मचारी जयेश बोणकर – १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे अपघात, सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात न्यायालयाने विशाल अगरवाल आणि इतर पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली.

पुणे अपघात, सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी

पुणे : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात न्यायालयाने विशाल अगरवाल आणि इतर पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, नितेश शेवाणी आणि जयेश बोणकर या पाच आरोपींनी जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला आहे. विशाल अगरवालने शुक्रवारी न्यायालयीन कामकाज संपेपर्यंत जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला नव्हता.

आरोपी – वेदांत अगरवाल – वय १७ वर्षे ८ महिने – जामीन रद्द, ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी
आरोपी – विशाल अगरवाल, वेदांतचे वडील – १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आरोपी – कोझी हॉटेलचा मालक प्रल्हाद भुतडा – १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आरोपी – कोझी हॉटेलचा व्यवस्थापक सचिन काटकर – १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आरोपी – ब्लॅक बारचा मालक संदीप सांगळे – १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आरोपी – कर्मचारी नितेश शेवाणी – १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आरोपी – कर्मचारी जयेश बोणकर – १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number