Sunday, August 17, 2025 05:21:00 PM

पुणेकरांना महागाईची झळ! टँकरचे पाणी महागले; PMC ने 5 टक्क्यांनी वाढवले पाण्याचे दर

पुणे महानगरपालिकेने खाजगी टँकर चालकांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा थेट परिणाम पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी खाजगी टँकरवर अवलंबून असलेल्या नागरिकांवर होणार आहे.

पुणेकरांना महागाईची झळ टँकरचे पाणी महागले pmc ने 5 टक्क्यांनी वाढवले पाण्याचे दर
PMC Hikes Water Tanker Rates
Edited Image

पुणे: पुणेकरांसाठी वाईट बातमी आहे. कारण, आता पुणेकरांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे. पुणे महानगरपालिकेने खाजगी टँकर चालकांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा थेट परिणाम पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी खाजगी टँकरवर अवलंबून असलेल्या नागरिकांवर होणार आहे. ज्या भागात महानगरपालिका स्वतः पुरेसे पाणी पुरवू शकत नाही, तिथे टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो. यात पर्वती, वडगाव शेरी, धायरी, रामटेकडी, चतुश्रृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग या भागांचा समावेश आहे. या भागात पाणी भरण्याचे केंद्र बांधण्यात आले आहेत, जिथून खाजगी टँकर देखील पाणी भरतात.

उन्हाळ्यात टँकरच्या मागणीत वाढ -   

सध्या उन्हाळा सुरू असल्याने टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. तथापि, मे महिन्यात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशातचं आता पाणी भरण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या रकमेत 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. पाणी वितरण खर्च वाढल्याने नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे. 

हेही वाचा - Volvo Bus Catches Fire: पुणे-सातारा महामार्गावर व्होल्वो बसला आग; प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारून वाचवला जीव

पाणी टँकरसाठी नवीन दर निश्चित - 

दरम्यान, पाण्याच्या टँकरच्या दरात 5 टक्के वाढ केल्यानंतर आता नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत. 10,000 लिटर क्षमतेच्या टँकरचा जुना दर 666 रुपये होता, जो आता 699 रुपये झाला आहे. त्याच वेळी, 10,000 ते 15,000 लिटरच्या टँकरचा दर 1,048 रुपयांवरून 1,101रुपये झाला आहे. 

हेही वाचा - पुण्यात चौथ्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू; कंत्राटदारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

तथापि, 15,000 लिटरपेक्षा जास्त क्षमतेच्या टँकरसाठी नागरिकांना आता 1,478 रुपयांऐवजी 1,552 रुपये द्यावे लागतील. या वाढीनंतर, खाजगी टँकर ऑपरेटर देखील त्यांच्या सेवांसाठी शुल्क वाढवू शकतात, ज्यामुळे सामान्य जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार पडेल.
 


सम्बन्धित सामग्री