Sunday, August 17, 2025 05:21:04 PM

हिंदवी पाटीलकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध; पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा

दहशतवादी हल्ल्याचा लावणी कलावंतांकडून निषेध करण्यात आला आहे. हिंदवी पाटीलने पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आहेत.

हिंदवी पाटीलकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा

पुणे : पहलगाममधील हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा दुर्देवी बळी गेला. दहशतवाद्यांनी धर्म विचारत पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केली. यात 26 लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील सहा जणांचा यामध्ये समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्याचा लावणी कलावंतांकडून निषेध करण्यात आला आहे. हिंदवी पाटीलने पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आहेत. 

जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भर कार्यक्रमात लावणी कलावंतांकडून निषेध आणि संताप व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी दौंड मधील भर कार्यक्रमात लावणी कलावंत आणि रिल्स स्टार हिंदवी पाटील हिने पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी प्रेक्षकांनी देखील हिंदवी पाटील हिच्या पाकिस्तान विरोधातील घोषणाबाजीला प्रचंड प्रतिसाद दिला. दरम्यान हिंदवी पाटील हिने शोक व्यक्त केला. 

हेही वाचा : भारताकडून सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती; पाकड्यांची कोंडी

मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममधील बैसरन भागात मंगळवारी 4.30 च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. पर्यटकांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्यात काही जण जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्य सरकार महाराष्ट्रातील काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी आणि गुरूवारी काश्मीरमधील पर्यटकांची यादी जाहीर केली आणि त्यांना राज्यात परत आणण्यासाठी विमानाची सोय केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी पहलगामसाठी रवाना झाले आहेत. त्यांनी तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांची विचारपूस देखील शिंदेंनी केली आहे. 


सम्बन्धित सामग्री