समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना! कच्ची घाटीजवळ आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे सत्र सुरु आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरच्या कच्ची घाटी जवळ समृद्धी महामार्गावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.

समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना! कच्ची घाटीजवळ आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
Samruddhi Expressway Crime News

समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे सत्र सुरु आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरच्या कच्ची घाटी जवळ समृद्धी महामार्गावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. समृद्धी महामार्गावरील चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून रात्रीच्या सुमारास मर्डर करून गाडीमधून समृद्धी महामार्गावर मृतदेह फेकला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मुळताच चिकलठाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत तसेच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पोस्टमार्टमन रिपोर्टच्या माध्यमातून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान मृतदेह बाहेरील राज्यातील असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा- 17 वर्षीय मुलाची लिंगबदलाची इच्छा; विरोध होताच आईसोबतचं केलं भयंकर कृत्य

पोलीस याप्रकरणी रात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच जवळच्या टोल प्लाझावरील नोंदी तपासत आहेत. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, इतर पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून मिसिंग तक्रारींची पडताळणी केली जात आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.

मृत व्यक्तीचे कपडे आणि इतर वस्तूंच्या आधारे ही हत्या प्रेमप्रकरणातून, जुन्या वैमनस्यातून की लुटमारीच्या उद्देशाने झाली आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, समृद्धी महामार्गावर लागोपाठ घडणाऱ्या अपघातांच्या आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून समृद्धी महामार्गावर घडणाऱ्या घटनांमुळे पुन्हा एकदा भीतीचे आणि खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number