काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबारप्रकरणी सातही आरोपींवर मकोका; एक आरोपी अजूनही फरार, पोलिसांचा तपास सुरू

नागपूरच्या भांडेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रावणनगर येथे काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या निवासस्थानी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती.
congress corporator shubham motghare
congress corporator shubham motghare

नागपूर : नागपूरच्या भांडेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रावणनगर येथे काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या निवासस्थानी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील अटक केलेल्या सात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या तपासात फरार आरोपी विशाल ऊर्फ फल्ली गुप्ता याने गोळीबाराची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्ही चित्रणात मोपेडवरून आलेल्या दोन तरुणांपैकी एकाने गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले. आरोपींकडून 60 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. फरार आरोपी विशाल ऊर्फ फल्ली गुप्ता याचा शोध सुरू आहे.

हेही वाचा : दुर्दैवी घटना! जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; 3 तरुणांचा जागीच मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version