टायगर श्रॉफ प्रकरणात खळबळजनक खुलासा; 8 आरोपींना अटक, दिल्ली ते हरियाणापर्यंत कनेक्शन उघड

Tiger Shroff Case Update : अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणात मुंबई पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आठ झाली आहे. पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली.

टायगर श्रॉफ प्रकरणात खळबळजनक खुलासा; 8 आरोपींना अटक, दिल्ली ते हरियाणापर्यंत कनेक्शन उघड
Tiger Shroff Case Update

मुंबई पोलिसांनी अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी कारवाई केलेली आहे. या प्रकरणी आणखी 5 आरोपींना अटक करण्यात आलेली असून एकूण आरोपींची संख्या आता ही 8 झालेली आहे. याबाबत पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलेली आहे. घटना घडल्यानंतर फक्त आणि फक्त 15 तासांमध्ये पोलिसांनी 3 आरोपींना अटक केलेली होती. त्यानंतर वेगवान तपास करत आणखी 5 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

 तपासात काय समोर आलं?
यामधील 4 आरोपींना दिल्ली पोलिसांच्या मदतीने दिल्लीमधून अटक केली, तर एका आरोपीला हरियाणा येथील सोनीपत येथून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये चक्क 2 महिलांचाही समावेश आहे. या दोन महिलांना कुरिअर म्हणून वापरण्यात आलेले होते.

हेही वाचा- रश्मिकाला लग्नासाठी 100 वेळा विचारावं लागलं? विजय देवरकोंडा ट्रोल; नेमकं काय घडलं?

मुंबईतील गोळीबार प्रकरणात शस्त्रांचा पुरवठा कुठून?
दोन आरोपी हे पंजाबमधील अमृतसर येथून शस्त्रे आणण्यासाठी गेले होते. हरियाणामधून अटक केलेल्या आरोपीने गुन्ह्यासाठी गाडी आणि वाहतुकीचीही व्यवस्था करुन दिलेली होती, अशी माहिती आहे. शिवाय या घटनेच्या एक दिवस आधीच त्याने मुंबईत सोडले होते, तर दिल्लीतून पकडलेल्या आरोपींनी शस्त्र पुरवण्याचे काम केले होते.

दोन्ही महिला हा आरोपी एकमेकींना आधीपासून ओळखत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी व्हॉट्सअॅवर अनेक अफवा पसरत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केलेले आहे. शिवाय सेलिब्रिटींना ठरलेल्या एसओपीनुसार सुरक्षा पुरवली जात असल्याचेही रोशन यांनी स्पष्ट केले.

 

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number