प्रफुल खंडारे. प्रतिनिधी. बुलढाणा: शिक्षकाने विद्यार्थ्यांचा अपमान केल्याने दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. नांदुरा तालुक्यातील वसाडी गावातील जय बजरंग विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रश्नाचे उत्तर देता आले नाही म्हणून शिक्षकाने त्याला 100 उठाबशा काढण्यास सांगितले. त्यानंतर शिक्षकाने त्याच्या पालकांचा अपमान केला. त्यामुळे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेही वाचा: 'हिंदीला विरोध करुन इंग्रजीसाठी पायघड्या'; फडणवीसांनी लगावला ठाकरेंना टोला
नेमकं प्रकरण काय?
मंगळवारी शाळेत वर्ग सुरू असताना गोपाल सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाने वर्गात विवेकला प्रश्न विचारले. मात्र, या विद्यार्थ्याला प्रश्नाचे उत्तर देता आले नाही म्हणून शिक्षकाने विवेकला 100 उठाबशा काढायला लावल्या. त्यांनंतर त्याच्या आई वडिलांचा देखील अपमान केला. आई वडिलांचा अपमान जिव्हारी लागल्याने शाळा मधेच सोडून विवेक घरी आला आणि सुसाईड नोट लिहिला. त्यानंतर, त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर, संबंधित विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी शाळेत जाऊन त्या शिक्षकाला बेदम मारहाण देखील केली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा: Today's Horoscope: 'या' राशींचे जातक आणतील स्वत:च्या आयुष्यात नवीन चमक आणि सुंदर क्षण
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होतं?
विनायकच्या खिशातून एक सुसाईड नोट मिळाला. ज्यात त्याने लिहिले की, 'शिक्षक सूर्यवंशी यांनी आपला छळ केला. इतकच नाही तर त्यांनी आपल्या पालकांविषयी अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला'. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.