देखण्या मामीच्या प्रेमात भाचा वेडापीसा! मामाच्या घरी जात केलं असं काही…; सकाळचे दृश्य पाहून सर्वच हादरले

Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशातील बांदा येथे नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कौटुंबिक वादातून तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं आणि या प्रकरणामागील कारण काय, जाणून घ्या.

देखण्या मामीच्या प्रेमात भाचा वेडापीसा! मामाच्या घरी जात केलं असं काही…; सकाळचे दृश्य पाहून सर्वच हादरले
Crime News

काही नाती ही विश्वासावर उभी असतात, तर काही नात्यांमध्ये थोडीतरी संशयाची ठिणगी पडली तरी संपूर्ण परिस्थिती ही हाताबाहेर जाते. उत्तर प्रदेशातील बांदा येथे घडलेल्या एका घटनेने साधारण कौटुंबिक नात्यामधील अत्यंत भयावह रुप समोर आणलेलं आहे. सणामुळे गावी आलेल्या एका तरुणाचा आपल्याच मामाच्या घरी झालेल्या भाडंणानंतर दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या प्रकरणामागील समोर आलेला जो घटनाक्रम होता त्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडवली आहे.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण हा गुजरातमध्ये मजुरीचं काम करत होता. एका उत्सवाच्यामुळे तो अवघे दोन दिवसांसाठी गावी परत आला होता. त्यानंतर तो तरुण आपल्या मामाच्या घरी गेला असून रात्री मामा आणि भाच्याने सोबत दारु प्यायली असल्याची माहिती आहे. काही वेळाने मामा घराच्या छतावर झोपण्यासाठी गेला. मात्र, जेव्हा मामाला जाग आली तेव्हा भाचा हा मामीसोबत आक्षेपार्ह स्थितीत होता, असा आरोप करण्यात आला.

हेही वाचा – मामाने भाच्याला चॉकलेटऐवजी दिली लोडेड पिस्तूल; खेळताना अचानक गोळी सुटल्याने 3 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

भाच्याला मामाच्याच बायकोसोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद क्षणात इतका वाढत गेला की, मामाने थेट लाठी-काठीने भाच्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला.

दार उघडताच घरच्यांना बसला धक्का
धक्कादायक म्हणजे, आरोपीने साथीदाराच्या मदतीने भाच्याचा मृतदेह हा घराच्या दरवाजाजवळ फेकून दिला होता. जेव्हा कुटुंबीयांनी मृतदेह पाहिला तेव्हा मोठी खळबळ उडाली. संबंधित घटनेची माहिती पोलिसांनी दिली गेली. तरुणाच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपींनी अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

 

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number