तीन मुलांना अन् पतीला सोडलं, प्रियकरासोबत मुंबईत आली; नाल्यातील दृश्याने उडाली खळबळ

Crime News : उत्तर प्रदेशातील तीन मुलांची आई असलेल्या रुखसानाने पतीला सोडून जुन्या प्रियकरासोबत मुंबई गाठली. मात्र, काही दिवसांतच ती बेपत्ता झाली. 18 ऑक्टोबर रोजी वांद्रे परिसरातील नाल्यात तिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकरणात आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
क्राईम न्यूज
Crime News

पदरात तीन मुलं, पतीसोबत सुखाचा संसार सुरु होता. मात्र, अचानक ही महिला आपल्या प्रियकरासोबत उत्तर प्रदेशातून मुंबईला निघून गेली. पण काही दिवसांत मुंबईतील एका नाल्यात असं काही दृश्य दिसलं की,सर्वांनाचा धक्का बसला. घर सोडून प्रियकरासोबत आलेल्या या महिलेच्या आयुष्यात पुढे नेमकं काय घडलं? या प्रकरणामागचं गूढ काय आहे?

अखेर काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बिजनौरच्या सडकपूर या गावातील संबंधित महिला रुखसाना वास्तव्यास होती. तर या भागात राहणात असलेल्या साकीब या तरुणासोबत तिचा प्रेमसंबंध होते. मग समाजामुळे त्यांनी एकमेंकाशी लग्न केले नव्हते. त्यानंतर काही दिवसात रुखसानाचे लग्न कंठ या गावात झाले आणि तीन मुले देखली झाले. लग्नाच्या काही वर्षांनंतर 2026 मध्ये रुखसाना पुन्हा साकिबच्या संपर्कात आली. साकिबसोबत वारंवार बोलण-भेटणं तीच वाढतं गेलं. रुखसानाला परत आणण्यासाठी तिच्या घरच्यांनी प्रयत्न केले. मात्र, तिने पती आणि मुलांसह राहण्यास पूर्णपणे नकार दिला, नंतर रुखसाना हट्टाने मुंबईत साकीबकडे परतली. मुंबईत साकीब रिक्षा चालवत होता.

हेही वाचा – प्रेमसंबंधाच्या संशयातून महिला कर्मचाऱ्यावर चाकूने सपासप वार; जागीच मृत्यू, अहिल्यानगरमध्ये खळबळ

साकीबबाबत नवा खुलासा
रुखसाना ज्या साकीब सोबत पुन्हा संपर्कात आली त्या तरुणाचेही लग्न झाले होते. मुंबईत आल्यानंतर साकिबची पत्नी तिथेच राहण्यासाठी आली होती, या कारणामुळे रुखसाना आणि साकिबच्या पत्नीमधील वाद आणखीच वाढत गेला. याच दरम्यान 26 सप्टेंबर रोजी रुखसाना मुंबईच्या सांताक्रूझ या परिसरातून अचानक गायब झाली. रुखसाना घरी न आल्याने तिचा प्रियकर साकिबने ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी शोध घेऊन ही बरेच दिवस तिचा काहीच तपास लागला नाही.

अखेर रुखसानाचं सत्य समोर?
अखेर 18 ऑक्टोबर रोजी, मुंबईतील वांद्रे परिसरातील कचराकुंडीजवळील असलेल्या एका नाल्यात रुखसानाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. रुखसानाच्या वडिलांनी तिचा प्रियकर साकिबवर तिच्या हत्येचा आरोप लावला आहे. या घटनेने रुखसानाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असून कुटुंबाने न्यायाची मागणी केली आहे. पोलिस तपासातून रुखसानाच्या मृत्यूमागील खरे कारण उघडकीस येईल.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version