राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रिक्त पदांवर नियुक्त्या करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. याचपार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आमदार झिशान सिद्दिकी आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते उमेश पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची तर मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी सोलापूर जिल्हाअध्यक्ष उमेश पाटील यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी उमेश पाटील यांची पक्षाच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी तर मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती जाहीर केली.
ससून डॉकमधील महिला मच्छीमारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून महिला मच्छीमारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज दुपारी 12.30 वाजता ससून डॉक येथे हा कार्यक्रम होणार आहे.
31 ऑक्टोबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. कुशावर्त कुंड आणि नवीन घाट परिसरात ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून, नाशिक–त्र्यंबकेश्वर मुख्य रस्ता 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 31 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे नाशिककरांना त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी दानिश शेख याच्या जामीन अर्जावरील निकाल जिल्हा सत्र न्यायालयाने राखून ठेवला आहे. जामीन अर्जावर न्यायालयात सुमारे दीड तास इन-कॅमेरा सुनावणी झाली. यावेळी कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दानिश शेखला हजर करण्यात आले. गेल्या सात महिन्यांपासून तो कारागृहात आहे. या प्रकरणात यापूर्वी काही संशयितांना जामीन मंजूर झाला असला, तरी दानिश शेख अद्याप कारागृहात आहे.
मराठी व्यंगचित्रकलेचा शंभर वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाचे उद्या, 29 ऑक्टोबर रोजी प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन ग्रंथालीतर्फे करण्यात येणार आहे. दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होईल. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे साहित्य आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.