सिगारेटचे चटके, मारहाण…; प्रेयसीकडूनच प्रियकराचा अमानुष छळ; इमारतीवर नेलं अन् पुढे जे घडलं ते हादरवणारं

Shocking Crime News : नात्यात आल्यानंतर सुंदर स्वप्न सजवायला सुरुवात होते. जोडीदाराकडून अनेक अपेक्षा ही केल्या जातात, तर दुसऱ्या बाजूला त्याला समजूनही घेतले जाते. मात्र, सध्या प्रेयसीने प्रियकरासोबत असं काही केलं आहे की अख्खं शहरचं हादरुन गेलं आहे.
लिव्ह-इन पार्टनरकडून प्रियकासोबत धक्कादायक कृत्य
Uttar Pradesh Shocking Crime News

नात्यात आल्यानंतर सुंदर स्वप्न सजवायला सुरुवात होते. जोडीदाराकडून अनेक अपेक्षा ही केल्या जातात, तर दुसऱ्या बाजूला त्याला समजूनही घेतले जाते. मात्र, सध्या प्रेयसीने प्रियकरासोबत असं काही केलं आहे की अख्खं शहरचं हादरुन गेलं आहे.

नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या हजरतगंज भागातील एका अपार्टमेंटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. शिवा शर्मा या नावाच्या तरुणाचा इमारतीवरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला. 9 ऑक्टोबर रोजी साधारण रात्री साडेआठ वाजता रश्मीने शिवाच्या आईला फोन करत शिवा इमारतीवरुन पडल्याचे सांगितल्यासह त्याला लोहिया रुग्णालयात नेले असल्याचे तिने सांगितले. मात्र, घरचे तिथे पोहोचले तेव्हा शिवा तिथे नव्हता.

हेही वाचा-राजगड सर करताना 35 वर्षीय पर्यटकाची प्राणज्योत मालवली; हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज

कुटुंबीय शिवाचा शोध घेत असताना तब्बल दीड तासानंतर त्याला मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आल्याचे कळाले. त्यानंतर मेडिकल कॉलेजबाहेर एक धक्कादायक प्रकार समोर आला. रश्मीच्या बहिणीचा ड्रायव्हर दानिश हा स्वत:ला सौरव कश्यप म्हणून फोन करत होता. घरच्यांना पाहताच तो जखमी शिवाला रुग्णवाहिकेत सोडून तसाच पळून गेला.

समोर आलं धक्कादायक सत्य
रुग्णवाहिका चालकाने सांगितले की, तो तीन तासांपासून 2 रुग्णालयांचे फेरे वारंवार मारत होता. शिवाच्या अंगावक अमानुष मारहाणीच्या खुणा होत्या. शिवाचे दोन्ही डोळे सुजलेले, जबडा तुटलेला, बरगड्या मोडलेल्या होत्या. एवढेच नाही तर त्याच्या शरीरावर सिगारेटचे चटके आणि नखांच्या खुणा देखील होत्या. शिवाच्या आईने आरोप केला आहे की, आधी त्याला जबरदस्ती डांबून ठेवण्यात आले त्यानंतर मारहाण करुन इमारतीवरुन खाली फेकले. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version