Ahilyanagar Violent Clash: अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. सोमवारी शहरात 'आय लव्ह मोहम्मद' या वादावरून जातीय संघर्ष झाला. स्थानिक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. तसेच या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 30 जणांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - Palghar Crime News : धक्कादायक! लेकराचा चिकनचा हट्ट ठरला अखेरचा; आईनं लाटण्यानं बेदम मारहाण करत घेतला मुलाचा जीव
रांगोळीवरून पेटला वाद -
प्राप्त माहितीनुसार, ही घटना माळीवाडा परिसरात घडली, जिथे काही अज्ञात लोकांनी 'आय लव्ह मोहम्मद' ची रांगोळी काढली होती. यामुळे मुस्लिम समुदायाचे शेकडो सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत कोतवाली पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली.
हेही वाचा - Nepal Gen Z Protests : नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनाचा थरार! चौदा हजाराहून जास्त कैदी तुरुंगातून फरार, काही स्वतःहून आले माघारी
स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी जावून रांगोळी काढणाऱ्यांची ओळख पटवली. त्यापैकी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी काही ठिकाणी सौम्य बळाचा वापर केला. या हिंसक संघर्षामुळे शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.