वाशिम जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी एका किराणा व्यावसायिकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
ही घटना कारंजा शहरातील आहे. 45 वर्षीय किराणा व्यावसायिकाने ओळखीतील अल्पवयीन मुलीला ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
एप्रिल 2023 ते जून 2026 या कालावधीत हा प्रकार घडल्याची तक्रार आहे. या घटनेमुळे पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचेही समोर आले असून, आरोपीने तिचा गर्भपात केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
याप्रकरणी आरोपी प्रफुल्ल साखरकर असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-