Saturday, January 17, 2026 04:19:57 PM

Who is Avadhut Sathe : अवधूत साठेने 4.1 लाख विद्यार्थ्यांना कसं फसवलं? SEBI ने घातली बंदी; 546 कोटी रुपये परत करण्याचे आदेश

सेबीचा मुख्य आरोप हा आहे की, कोर्सच्या नावाखाली अनरजिस्टर्ड गुंतवणूक सल्ला दिला गेला आणि सोशल मीडिया तसेच मार्केटिंगच्या माध्यमातून चुकीचे वातावरण तयार केले.

who is avadhut sathe  अवधूत साठेने 41 लाख विद्यार्थ्यांना कसं फसवलं sebi ने घातली बंदी 546 कोटी रुपये परत करण्याचे आदेश

Avadhut Sathe Cheated 4.1 Lakh Students : भारताच्या शेअर बाजार नियामक (Stock Market Regulator) सेबीने (SEBI) अवधूत साठे याच्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. सेबीने त्याला सिक्युरिटीज मार्केटमधून बॅन (Banned from Securities Market) केले आहे. तसेच, त्याचा कथित 546 कोटी रुपयांचा अवैध नफा (Unlawful Gain) जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. अवधूत साठे याच्यावर रजिस्टर नसतानाही गुंतवणूकदारांना (Investors) गुंतवणुकीचा सल्ला (Investment Advice) देऊन दिशाभूल केल्याचा आरोप आहे.

प्रसिद्ध फिनइन्फ्लुएन्सर अवधूत साठे
अवधूत साठे हे एक प्रसिद्ध फिनइन्फ्लुएन्सर (Finfluencer) आणि अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमीचा (ASTA) संस्थापक आहे. त्याच्या ॲकॅडमीद्वारे तो ट्रेडिंग आणि गुंतवणुकीशी संबंधित कोर्सेस विकत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची ॲकॅडमी 2017 च्या आसपास सुरू झाली. त्यानंतर त्याने एक नवीन एन्टिटी तयार केली, जिथे परिचय सत्रांपासून ते हाय-एंड मेंटरशिपपर्यंत अनेक प्रकारचे कोर्सेस देऊ केले जात होते.

शिक्षण की सल्ला? सेबीचा नेमका आरोप काय?
सेबीच्या माहितीनुसार, या कोर्सेसची फी काही शेकडो रुपयांच्या परिचय वर्गांपासून ते लाखो रुपयांच्या मेंटरशिप प्रोग्रामपर्यंत होती. सेबीचा आरोप आहे की, शिक्षणाच्या नावाखाली लाइव्ह मार्केटमध्ये (Live Market) स्टॉक्सवर (Stocks) रियल-टाइम ट्रेडिंग शिफारसी (Real-time Trading Recommendations) दिल्या जात होत्या. नियामकाच्या सेबीचे असे म्हणणे आहे की, ही कृती रजिस्टर्ड ॲडव्हायझरीच्या (Registered Advisory) कक्षेत येते.

हेही वाचा - Gold Rate Today : रेपो रेट कपातीनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, आठवड्याभरात सोनं-चांदीच्या दरात किती बदल?

65 टक्के ग्राहकांना तोटा, तरीही दिशाभूल
सेबीचा मुख्य आरोप हा आहे की, कोर्सच्या नावाखाली अनरजिस्टर्ड गुंतवणूक सल्ला दिला गेला आणि सोशल मीडिया तसेच मार्केटिंग सामग्रीत खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या यशाच्या कथा दाखवण्यात आल्या. काही व्यक्तींचे व्हिडीओ दाखवून त्यामध्ये असा दावा करण्यात आला की, या विद्यार्थ्यांनी कोर्सच्या स्ट्रॅटेजीजमधून लाखो रुपये कमावले; परंतु सेबीच्या विश्लेषणात तीच खाती प्रत्यक्षात तोट्यात असल्याचे दिसून आले.

546 कोटी रुपयांचा नफा जप्त करण्याचे आदेश
सेबीच्या अंदाजानुसार, या गैर-नियामक उपक्रमांद्वारे एकूण सुमारे 600 कोटी रुपयांची कमाई झाली. यापैकी सुमारे 546 कोटी रुपयांचे दस्तऐवजी पुरावे सापडले आहेत, ज्याला अवैध नफा मानून तात्काळ जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सेबीच्या तपासाचा एक भाग म्हणून 186 ग्राहकांच्या ट्रेड डेटाचे विश्लेषण करण्यात आले, ज्यात सुमारे 65 टक्के ग्राहकांनी कोर्स संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत 1 कोटी 93 लाख रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा सहन केला.

हेही वाचा - Avadhut Sathe: अवधूत साठेंवर SEBI ची मोठी कारवाई! 546.16 कोटी बेकायदेशीर कमाई जप्त करण्याचे आदेश


सम्बन्धित सामग्री






ताज्या बातम्या




ताज्या बातम्या