इंदूर: इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडात आज धक्कादायक खुलासा झाला आहे. राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी हिने तिच्या पतीला मारण्याचा कट रचला असा आरोप करणयात येत आहे. हनीमूनदरम्यान तिने आपल्या पतीची हत्या केली आणि त्यानंतर ती बेपत्ता झाली. सोनमने हे सर्व तिचा प्रियकर राज कुशवाहासाठी केले. सोनम आणि राज कुशवाह यांचे बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. अशा परिस्थितीत जेव्हा सोनमचे राजा रघुवंशीशी लग्न झाले तेव्हा सोनमने तिच्या प्रियकराला मिळवण्यासाठी तिच्या पतीला संपवले. सोनमचा प्रियकर राज कुशवाह नेमका कोण आहे? ते जाणून घेऊयात.
राज कुशवाहा सोनम रघुवंशीपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. प्रत्यक्षात सोनम रघुवंशीच्या कुटुंबाचे प्लायवूडचे दुकान होते. राज कुशवाहा या दुकानात काम करायचा. दुकानात ये-जा करताना सोनम राजला भेटली. काही काळात दोघांची मैत्री झाली आणि नंतर ही मैत्री प्रेमात बदलली.
हेही वाचा - 'मी आरोपी नाही, माझे अपहरण करण्यात आले...'; पतीच्या हत्येनंतर सोनम रघुवंशीची पहिली प्रतिक्रिया
सोनमच्या कुटुंबाने तिचे लग्न इंदूरच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशीशी निश्चित केले. 11 मे 2025 रोजी सोनम आणि राजाचे लग्न झाले. तथापि, सोनम अजूनही तिचे प्रेम मिळवण्यासाठी प्रत्येक मर्यादा ओलांडण्यास तयार होती. परिणामी, लग्नानंतर अवघ्या 6 दिवसांनी राज कुशवाहाने राजाला मार्गातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - पती-पत्नी आणि मर्डर; मधुचंद्रासाठी गेलेल्या बेवफा सोनमने केली पतीची हत्या
हनिमूनदरम्यान केली पतीची हत्या -
दरम्यान, सोनमने योजनेनुसार राजाला हनिमूनसाठी मेघालयला नेले. राज कुशवाहाचे 3 मित्र शिलाँगमध्ये सोनमची वाट पाहत होते. गाईडने अशीही पुष्टी केली की राजा आणि सोनम शिलाँगमध्ये एकटे नव्हते तर त्यांच्यासोबत इतर 3 लोकही उपस्थित होते. चौघांनी मिळून राजाची हत्या केली. त्याचा मृतदेह लपवण्यासाठी खोल दरीत फेकून दिला.