CRIME : प्रियकरासोबत गेलेली पत्नी 3 महिन्यांनी परतली! आधी नाकाला चावा, नंतर गुप्तांग कापले; सासूसमोरच…

Shocking Crime News : तीन मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली आणि नंतर ती घरी पुन्हा परतली. त्यानंतर तिचा आणि तिच्या नवऱ्यामध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर जे घडलं त्याची कल्पना ही कोणी केली नव्हती.

Crime News : उत्तर प्रदेशच्या हरदोईमधून अत्यंत खळबळजनक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आलेली आहे. तीन महिन्यापूर्वी एक महिला आपल्या तीन मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली आणि नंतर ती घरी पुन्हा परतली. त्यानंतर तिचा आणि तिच्या नवऱ्यामध्ये जोरदार वाद झाला. याच वादात पत्नीच्या होत असलेल्या त्रासाला कंटाळून नवऱ्याने तिचे नाक चावले होते. नाकाला चावल्याने महिलेनं आरडाओरड केली. पत्नीने बदला म्हणून असं काही केलं ज्याने संपूर्ण शहर हादरुन गेलं आहे.

3 महिन्यांनी पत्नी परतली अन् क्षणात भडकला वाद
मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना हरदोहईच्या सांडी शहरातील मु्न्शीगंज येथील आहे. काही वर्षांपूर्वी एका तरुणाचे लग्न संबंधित महिलेसोबत झाले होते. तरुणाच्या आणि त्याच्या आईच्या आरोपानुसार, तीन महिन्यांपूर्वी त्याची पत्नी प्रेमप्रकरणातून शेजारच्या नौशेरा या परिसरातील एका तरुणासोबत पळून गेली होती.

हेही वाचा-Wardha Crime : वर्ध्यात संतापजनक घटना! रेल्वे स्थानकावर उतरलेल्या 19 वर्षीय तरुणीला मदतीच्या नावाखाली नेलं अन् पुढे घडलं धक्कादायक

पतीने पती आणि तिच्या प्रियकरावर कोर्ट मॅरेज केल्याचा आरोप केला होता. तक्रार दाखल होताच पोलीस ठाण्यात पंचायत घेण्यातही आली होती. या प्रकरणात महिलेच्या धाकट्या मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आल्याचा करार झाला होता. यानंतर ती मुलगी दिल्लीला निघून गेल्याचीही माहिती समोर आलेली आहे.

नवऱ्याला आणि मुलांना सोडून गेलेली महिला तीन महिने प्रियकरासोबत राहिल्यानंतर पुन्हा घरी परतली. त्यानंतर तिचे घरच्यांसोबत खटके उडू लागले होते. दररोज घरात वाद सुरु असत. घटनेदिवशी पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाले, ज्यामध्ये नवऱ्याचे रागात पत्नीचे नाक चावले. पतीने केलेल्या या कृत्याने पत्नी पूर्णपणे हादरुन गेली आणि तिने सुद्दा वचपा काढण्यासाठी नवऱ्याच्या गुप्तांगावर हल्ला करत कापले, असा आरोप संबंधित व्यक्तीच्या आईने केला आहे.

हेही वाचा-Crime : 60 रुपयांसाठी आईला संपवलं; मग ओलांडली क्रूरतेची सीमा, मृतदेहासोबतच…; लेकाचं धक्कादायक कृत्य

प्रकरण पोलीस ठाण्यात
रक्तस्त्राव झाल्याने दोघांनाही रुग्णालयात दाखल केले आहे. अशातच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या केलेल्या वैद्यकीय तपासणीत कोणतीही जखम आढळून आलेली नाही. मात्र, शांतता भंग केल्याप्रकरणी त्या तरुणावर कारवाई करण्यात आली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number