प्रदीप पुर्णेकर हत्याकांडात महिला कनेक्शन उघड; मुख्य आरोपीच्या संपर्कातील 3 महिला पोलिसांच्या ताब्यात

पप्या शिंदे हा पूर्वी मृत बाळू पूर्णेकर यांचा अत्यंत जवळचा मित्र मानला जात होता. त्यामुळे या महिलांचा या कटात प्रत्यक्षात काही सहभाग होता का, किंवा पूर्णेकर यांच्याशी त्यांचा काही जुना वाद होता का, या दृष्टीने पोलीस कसून चौकशी करत आहेत.

प्रदीप पुर्णेकर हत्याकांडात महिला कनेक्शन उघड; मुख्य आरोपीच्या संपर्कातील 3 महिला पोलिसांच्या ताब्यात
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात ट्विस्ट; महिला कनेक्शन समोर

Pradeep Balu Purnekar Case: ठाण्यातील घोडबंदर रोडवर शिवसेना (ठाकरे गट) विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या मृत्यूप्रकरणी दररोज नवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणाच्या तपासात आता एक वेगळे ‘महिला कनेक्शन’ उघडकीस आले असून, पोलिसांनी मिरा रोड परिसरातून 3 महिलांसह एकूण 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या या तिन्ही महिला मुख्य संशयित आरोपी पप्या शिंदे याच्या थेट संपर्कात होत्या. पप्या शिंदे हा पूर्वी मृत बाळू पूर्णेकर यांचा अत्यंत जवळचा मित्र मानला जात होता. त्यामुळे या महिलांचा या कटात प्रत्यक्षात काही सहभाग होता का, किंवा पूर्णेकर यांच्याशी त्यांचा काही जुना वाद होता का, या दृष्टीने पोलीस कसून चौकशी करत आहेत. या चौकशीतून हत्येमागील मुख्य सूत्रधार आणि कारस्थान समोर येण्याची शक्यता आहे.

डीसीपींच्या नेतृत्वाखाली 23 अधिकाऱ्यांचे SIT पथक गठीत

प्रकरणाचे वाढते राजकीय गांभीर्य आणि ठाण्यातील संवेदनशील वातावरण लक्षात घेता, या संपूर्ण तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त (DCP) अमरासिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करणार आहे. या पथकात 2 सहायक पोलीस आयुक्त (ACP), 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 6 सहायक पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 23 अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक वैज्ञानिक पुरावे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत आहे.

हेही वाचा – प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठा ट्विस्ट! मारेकरी शिंदे गटाच्या माजी महापौरांच्या इमारतीत? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

ठाण्यात कडक पोलीस बंदोबस्त

दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर पोलिसांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या नावांचा पुरवणी FIR मध्ये थेट समावेश केला आहे. पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला होता. राजकीय घडामोडींनंतर आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मीनाक्षी शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर कडक पोलीस सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number