ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा जोनास झाली निर्माती

प्रतिनिधी, मुंबई, दि. २६ फेब्रुवारी २०२४ : ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा जोनास एक कार्यकारी निर्माता म्हणून जागतिक स्तरावर काम करणार असून डॉक्युमेंटरी टू किल अ टायगर ची ती निर्माती झाली आहे. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिचरसाठी ऑस्कर नामांकन मिळविलेल्या या डॉक्युमेंटरी ने आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वडिलांच्या धाडसी लढाईची मार्मिक कथा सांगितली आहे. प्रियांका चोप्रा जोनासने […]

ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा जोनास झाली निर्माती

प्रतिनिधी, मुंबई, दि. २६ फेब्रुवारी २०२४ : ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा जोनास एक कार्यकारी निर्माता म्हणून जागतिक स्तरावर काम करणार असून डॉक्युमेंटरी टू किल अ टायगर ची ती निर्माती झाली आहे. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिचरसाठी ऑस्कर नामांकन मिळविलेल्या या डॉक्युमेंटरी ने आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वडिलांच्या धाडसी लढाईची मार्मिक कथा सांगितली आहे.

प्रियांका चोप्रा जोनासने तिच्या या नव्या कामाची घोषणा करण्यासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली ” ही कथा तिला का आवडली विशेषत: नायक म्हणून तिचा जन्म झारखंडमध्ये झाला होता. तिने टोरंटो-आधारित चित्रपट निर्मात्या निशा पाहुजा दिग्दर्शित चित्रपटाचा ट्रेलर देखील पोस्ट केला आणि ती खरोखरच उल्लेखनीय कथा असल्याचे वर्णन केले.”

प्रियांका चोप्रा जोनासची कार्यकारी निर्माती म्हणून या प्रोजेक्ट सोबत जोडली जान नक्कीच उल्लेखनीय आहे. नेटफ्लिक्स टू किल ए टायगरच्या जागतिक रिलीजसाठी सगळेच उत्सुक आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number