Urvashi Rautela Birthday: अभिनेत्रीचा थाटच न्यारा! वाढदिवसाला कापला 16 कोटींचा केक, 7 थर, खऱ्या हिऱ्यांची सजावट आणि…

हा जगातील सर्वात महागडा 7-स्तरीय केक असल्याचे म्हटले जात आहे. उर्वशीने स्वतः या केकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.<br/>

Urvashi Rautela Birthday:  अभिनेत्रीचा थाटच न्यारा! वाढदिवसाला कापला 16 कोटींचा केक, 7 थर, खऱ्या हिऱ्यांची सजावट आणि…

Urvashi Rautela Birthday: बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री उर्वशी रौतेलाने 25 फेब्रुवारी रोजी आपला 32 वा वाढदिवस अत्यंत दिमाखात साजरा केला. नेहमीच आपल्या आलिशान जीवनशैलीमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्वशीने यावेळी सर्व विक्रम मोडले आहेत. तिने तिच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 16 कोटी रुपयांचा (2.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) केक कापला असून, हा केक खऱ्या हिऱ्यांनी जडवलेला होता. हा जगातील सर्वात महागडा 7-स्तरीय केक असल्याचे म्हटले जात आहे. उर्वशीने स्वतः या केकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

7-स्तरीय केक आणि हिऱ्यांची झळाळी
उर्वशीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती हा भव्य केक पाहून थक्क झाल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये तिने केकवर लावलेल्या खऱ्या हिऱ्यांची झलक कॅमेरा जवळ नेऊन दाखवली आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला असला तरी, अनेकांनी इतक्या महागड्या केकबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. काहींनी गमतीने “हे हिरे खरे आहेत की नाही हे कसे ओळखायचे?” असे प्रश्नही विचारले आहेत. हा केक सध्या इंटरनेटवर सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे.

फोर्ब्स रिच लिस्ट आणि महागड्या गाड्यांचे कलेक्शन
उर्वशी रौतेला केवळ तिच्या चित्रपटांमुळेच नाही, तर तिच्या संपत्तीमुळेही चर्चेत असते. गेल्या वर्षी 12 कोटी रुपयांची ‘रोल्स-रॉइस कलिनन ब्लॅक बॅज’ खरेदी करणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली होती. त्यानंतर तिने ‘इंस्टाग्राम फोर्ब्स रिच लिस्ट’मध्येही मानाचे स्थान मिळवले. आता तिच्या ताफ्यात आणखी एका आलिशान गाडीची भर पडली असून, तिने 5 कोटी रुपयांची हिरवी ‘जी-वॅगन’ (G-Wagon) खरेदी केल्याची माहिती तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरून दिली आहे.

हेही वाचा – Tanvi Kolte: बिग बॉस फेम तन्वी कोलतेला बसला डिजिटल फटका; लाखो फॉलोअर्स असलेले इन्स्टाग्राम अकाऊंट गायब

मॉडेलिंगपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास
उर्वशीने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. 2009 मध्ये ‘मिस टीन इंडिया’चा किताब जिंकल्यानंतर तिने लॅक्मे फॅशन वीक आणि दुबई फॅशन वीकसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर रॅम्प वॉक केला. 2013 मध्ये ‘सिंग साब द ग्रेट’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘हेट स्टोरी 4’ आणि अलिकडच्या ‘डाकू महाराज’ (2025) यांसारख्या अनेक चित्रपटांमधून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number