Aamir Khan Emotional Video: बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान आपल्या अभिनयासाठी ओळखला जातोच, पण नुकताच त्याचा एक वेगळा आणि अत्यंत भावूक अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला. आपला मुलगा जुनैद खान याच्या आगामी 'एक दिन' चित्रपटाच्या संगीत सोहळ्यात आमिर खानला आपल्या अश्रूंवर नियंत्रण ठेवता आले नाही. भर कार्यक्रमात रडणाऱ्या आमिरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
जुनैद खान आणि दाक्षिणात्य सुंदरी साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'एक दिन' चित्रपटाच्या निमित्ताने 'एक दिन की महफिल' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात जेव्हा गाणी सुरू झाली, तेव्हा वडिलांच्या नात्याने आमिर खान प्रचंड हळवा झाला. आपल्या मुलाचा चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा मोठा चित्रपट पाहून त्याला आनंदाश्रू अनावर झाले. इतके की, त्याने आपल्या शर्टनेच डोळ्यांतील पाणी पुसले. यावेळी साई पल्लवी आणि स्वतः जुनैद त्याला सावरताना दिसले.
साई पल्लवी 'देशातील सर्वोत्तम अभिनेत्री'
या सोहळ्यात आमिरने चित्रपटाची नायिका साई पल्लवीचे तोंडभरून कौतुक केले. साई पल्लवीने आपला हा पहिलाच हिंदी चित्रपट असल्याने थोडी धाकधूक वाटत असल्याचे सांगताच, आमिर म्हणाला, "माझ्या मते, साई पल्लवी ही सध्या आपल्या देशातील सर्वोत्तम अभिनेत्री आहे. जुनैदबद्दल बोलायचे तर तो बऱ्यापैकी काम करतोय, पण तो माझा मुलगा असल्याने मी जास्त काही बोलणार नाही."
हेही वाचा - Michael Movie Collection: पॉपचा बादशहा MJ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मायकेल जॅक्सनच्या बायोपिकची ऐतिहासिक ओपनिंग; पहिल्याच दिवशी कमावले...
1 मे रोजी होणार चित्रपट प्रदर्शित
'एक दिन' हा एक रोमँटिक ड्रामा असून या चित्रपटाद्वारे साई पल्लवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सुनील पांडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून खुद्द आमिर खान या चित्रपटाचा निर्माता आहे. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.