Friday, June 12, 2026 10:29:55 PM

Michael Movie Collection: पॉपचा बादशहा MJ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मायकेल जॅक्सनच्या बायोपिकची ऐतिहासिक ओपनिंग; पहिल्याच दिवशी कमावले...

जागतिक स्तरावरही दमदार कामगिरी करत हा चित्रपट 200 अब्ज डॉलर क्लबकडे वेगाने वाटचाल करत आहे.

michael movie collection पॉपचा बादशहा mj चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ मायकेल जॅक्सनच्या बायोपिकची ऐतिहासिक ओपनिंग पहिल्याच दिवशी कमावले

पॉप संगीताचा बादशाह मानल्या जाणाऱ्या मायकेल जॅक्सन यांच्या आयुष्यावर आधारित ‘मायकेल’ या बायोपिकने बॉक्स ऑफिसवर जोरदार धडाका केला आहे. प्रदर्शित होताच या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 82 अब्ज डॉलरची कमाई करत विक्रमी सुरुवात केली आहे. याच गतीने चित्रपटाची कमाई सुरू राहिल्यास ओपनिंग वीकेंडमध्ये 200 अब्ज डॉलरचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विक्रमी ओपनिंग, बायोपिकसाठी सर्वोत्तम सुरुवात

रिपोर्टनुसार, या चित्रपटाने उत्तर अमेरिकेत पहिल्याच दिवशी 39 अब्ज डॉलरची कमाई केली. ही कोणत्याही बायोपिक चित्रपटासाठी आतापर्यंतची सर्वाधिक ओपनिंग ठरली आहे. या कामगिरीसह ‘मायकेल’ने ओपेनहायमर (Oppenheimer) या चित्रपटालाही मागे टाकले, ज्याने 33 अब्ज डॉलरची ओपनिंग केली होती.

जागतिक स्तरावर दमदार कामगिरी

चित्रपटाने परदेशी बाजारात 30 अब्ज डॉलरची कमाई केली असून, पेड प्रिव्ह्यूमधूनच 13 अब्ज डॉलरची कमाई झाली आहे. एकूण मिळून ‘मायकेल’ने जागतिक स्तरावर बायोपिक प्रकारातील सर्वोत्कृष्ट सुरुवात नोंदवली आहे. यासोबतच Bohemian Rhapsody सारख्या हिट चित्रपटांनाही मागे टाकले आहे.

हेही वाचा: Iran Pakistan Talk: 'आमचे शेजारी आहात, पण मध्यस्थ म्हणून तुमच्यावर विश्वास नाही'; इराणचा पाकिस्तानला मोठा झटका, भर सभेत काढले वाभाडे

वीकेंड कलेक्शनवर मोठी नजर

तज्ञांच्या मते, हा चित्रपट उत्तर अमेरिकेत वीकेंडपर्यंत 90 ते 95 अब्ज डॉलरची कमाई करू शकतो. जर तसे झाले, तर ‘ओपेनहायमर’ आणि स्ट्रेट आऊटा कॉम्पटन या चित्रपटांचे विक्रमही मोडले जातील.
200 अब्ज क्लबकडे वाटचाल

युनिव्हर्सलच्या अंदाजानुसार, 82 देशांमध्ये (जपान आणि कोरिया वगळता) हा चित्रपट वीकेंडमध्ये सुमारे 111 अब्ज डॉलरची कमाई करू शकतो. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांत जागतिक स्तरावर 200 अब्ज डॉलरचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. यामुळे हा चित्रपट या वर्षातील टॉप 10 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवू शकतो.

भारतातही चांगला प्रतिसाद

भारतातही ‘मायकेल’ला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पेड प्रिव्ह्यूमधून चित्रपटाने 1.70 कोटी रुपये कमावले, तर पहिल्या दिवशी 3.80 कोटी, दुसऱ्या दिवशी 5.10 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 5.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाची पकड मजबूत होत असल्याचे दिसत आहे. 

हेही वाचा: Food Poisoning Case : तुम्हालाही पाणीपुरी खूपच आवडते का? तर ही बातमी चक्की वाचा; पाणीपुरी खाल्ल्याने एका चिमुकल्याने गमावला जीव, तर 18 जण गंभीर


सम्बन्धित सामग्री