बिग बॉसच्या घरात ट्विस्ट! 5 आठवड्यांनंतर अखेर सलमान खानने सदस्यांना दिला ‘तो’ मोठा धक्का, नेमकं काय होणार?

हिंदी 'बिग बॉस 20' चे आतापर्यंत 5 आठवडे पार पडले आहेत. सलमान खान होस्टिंग करत असलेल्या 'बिग बॉस 20' मध्ये सदस्यांच्या खेळामुळे रोज ड्रामा पाहायला मिळत आहे.
Bigg Boss 20
Bigg Boss 20

हिंदी ‘बिग बॉस 20’ चे आतापर्यंत 5 आठवडे पार पडले आहेत. सलमान खान होस्टिंग करत असलेल्या ‘बिग बॉस 20’ मध्ये सदस्यांच्या खेळामुळे रोज ड्रामा पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस 20’ च्या घरात 16 स्पर्धकांनी एन्ट्री घेतली होती. त्यातील आतापर्यंत घरातून तीन जण बाहेर पडले आहेत. ज्यात रोहेद खान, ईशा रिखी, रिती तिवारी यांचा समावेश आहे.

हेही वाचा- महानायक अमिताभ बच्चन यांचा 84 वा वाढदिवस; चाहत्यांकडून होतोयं शुभेच्छांचा वर्षाव

दरम्यान नुकताच पार पडलेल्या विकेंड का वार मध्ये सलमान खानने सदस्यांना मोठा धक्का दिला आहे. बिग बॉस 20 च्या या सिझनमध्ये पहिल्या वाईल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री झाली आहे. ‘बिग बॉस 20’ च्या घरात टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता मनीष गोयलने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला आहे. या आठवड्यात 1 नाही तर चक्क 2 वाईल्ड कार्ड स्पर्धक घरात येणार आहे. त्यामुळे ‘बिग बॉस 20’च्या घरात दुसरा कोणता कलाकार वाईल्ड कार्ड म्हणून प्रवेश करणार याची चर्चा रंगली आहे. दरम्यान मनीषच्या एन्ट्रीमुळे घरातील सदस्य अस्वस्थ झाले आहेत.

कोण आहे मनीष गोयल?
मनीष गोयल एक अभिनेता असून त्याने ‘भाभी’, ‘कहानी घर घर की’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच त्याने ‘अनुपमा’ या मालिकेत राघव सिंगची भूमिकाही साकारली होती. याव्यतिक्त मनीष गोयलने ‘हम फिर मिलें ना मिलें’ या चित्रपटात देखील काम केलं आहे. तसेच मनीष गोयलने अनेक रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला आहे. त्याने त्याची पत्नी पूनम नरुलासोबत ‘नच बलिये’च्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेतला होता, जिथे ही जोडी उपविजेती ठरली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version