टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला, आता एक्स-गर्लफ्रेंड टार्गेटवर? दिशा पटानीच्या सुरक्षेत वाढ; नेमकं काय घडलं?

मुंबईतील जुहू परिसरात रविवारी संध्याकाळी टायगर श्रॉफच्या कारवर अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला होता. या भीषण हल्ल्यातून टायगर थोडक्यात बचावला असला, तरी त्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाले आहेत.

टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला, आता एक्स-गर्लफ्रेंड टार्गेटवर? दिशा पटानीच्या सुरक्षेत वाढ; नेमकं काय घडलं?
Disha Patani security increased

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर नुकत्याच झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर आता त्याची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री दिशा पटानी हिच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथे असलेल्या दिशाच्या मूळ निवासस्थानी तिचे कुटुंब वास्तव्यास आहे. या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सोमवारपासून तिच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली असून कुटुंबाभोवती पोलिसांचा कडेकोट पहारा लावण्यात आला आहे. मुंबईतील जुहू परिसरात रविवारी संध्याकाळी टायगर श्रॉफच्या कारवर अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला होता. या भीषण हल्ल्यातून टायगर थोडक्यात बचावला असला, तरी त्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत.

हल्लेखोरांवर पोलिसांची धडक कारवाई

विशेष म्हणजे, दिशा पटानीच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 12 सप्टेंबर 2025 रोजी देखील बरेली येथील तिच्या घराबाहेर बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी तब्बल 10 राऊंड गोळीबार केला होता. या गंभीर गुन्ह्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष कृती दल, हरियाणा एसटीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने 17 सप्टेंबर 2025 रोजी गाझियाबादमध्ये केलेल्या धडक कारवाईत रवींद्र आणि अरुण नावाच्या दोन संशयितांचा चकमकीत खात्मा केला होता. जुन्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि सध्याच्या हल्ल्याचा धागेदोरे जोडले जाऊ नयेत, म्हणून बरेली पोलिसांनी तातडीने दिशाच्या कुटुंबाच्या सुरक्षेची सर्व सूत्रे हातात घेतली आहेत.

टायगरवरील हल्ल्यातील आरोपी जेरबंद

मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या संयुक्त सहकार्याने अवघ्या काही तासांत मोठी कारवाई करत कोटा रेल्वे स्थानकावरून 3 संशयितांना जेरबंद केले आहे. सोमवारी सकाळी पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून त्यांना मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्लेखोरांमध्ये बिहारमधील बेगुसरायचा रहिवासी असलेला ऋतिक ऊर्फ रोशन, हरियाणातील सोनीपतचा रेहान आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

हेही वाचा – चार अभिनेत्यांच्या घराची रेकी, पोलिसांचा बंदोबस्त पाहून माघारी फिरले; खिलाडी, बिग बींसह टार्गेटवर होते ‘हे’ दिग्गज कलाकार

प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे की, मुंबईत गोळीबार केल्यानंतर हे आरोपी ट्रेनने नेपाळच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी जुहू परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत गुन्ह्यात वापरलेली पल्सर बाईक अंधेरीतून हस्तगत केली असून, आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number