बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट या वर्षीच्या दिवाळीच्या धन्तेरस सणात कपूर कुटुंबासोबत झळाळून दिसली आहे. तिची सासू नीतू कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून कुटुंबातील या सुंदर क्षणांचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात आलिया सोनसळी झगमगत्या साडीत अतिशय मनमोहक दिसत आहे.
या फोटोमध्ये आलिया आपल्या दोन सख्या भावजयी करिना कपूर आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत हसतमुखाने उभी आहे. नीतू कपूरने पोस्ट करताना या फोटोसोबत हृदय आणि फुलांच्या इमोजी शेअर केल्या. फोटोत नीतू कपूर गडद निळ्या रंगाच्या पारंपरिक पोशाखात तर आलिया सोनसळी भरजरी साडीत, भरगच्च दागिन्यांसह उठून दिसत आहे. तिच्या डावीकडे करिना हलक्या निळ्या आणि सोनसळी लेहेंगा सेटमध्ये, तर उजवीकडे करिश्मा काळ्या-पांढऱ्या रंगाच्या पोशाखात गोल्डन डिटेलिंगसह उठून दिसत आहे.
हेही वाचा : Parineeti Chopra Hospitalized: परिणीती चोप्रा रुग्णालयात दाखल; काही वेळातचं होऊ शकते प्रसूती
या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला. एका चाहत्याने लिहिले, “आलिया भट्ट आणि नीतू मॅम एकदम रॉयल दिसतायत!” तर दुसऱ्याने लिहिले, “आलिया इतकी सुंदर दिसतेय की तिच्यावरची नजर हटतच नाहीये.”
याच दिवशी अभिनेत्री सोहा अली खान हिनेही आपल्या कुटुंबातील धन्तेरस सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले. त्या फोटोंमध्ये सैफ अली खान, करीना कपूर, सोहा अली खान, कुणाल खेमू, आणि अमृता अरोरा हे सर्व एकत्र दिसले. सोहाने या पोस्टला कॅप्शन दिले आहे “Last night had some solid gold energy, #HappyDhanteras”, आणि पार्श्वसंगीत म्हणून “रौशनी ही रौशनी है” हे गाणं तीने वापरलं आहे.
व्यक्तिगत आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, आलियाने अभिनेता रणबीर कपूर सोबत एप्रिल 2022 मध्ये लग्न केले. त्यांची मुलगी राहा कपूरचा जन्म नोव्हेंबर 2022 मध्ये झाला. गेल्या ख्रिसमसला रणबीर आणि आलियाने प्रथमच राहासह सार्वजनिक उपस्थिती लावली होती.
कपूर कुटुंब आता बांद्रातील त्यांच्या नव्या ‘कृष्णा राज' बंगल्यात राहायला जाणार आहे. हा बंगला रणबीरच्या आजी कृष्णा राज कपूर यांच्या नावाने असून, कपूर कुटुंबासाठी भावनिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे.
चित्रपटांच्या आघाडीवर, आलिया लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत दिसणार आहे. तसेच ती शिव रावल दिग्दर्शित ‘अल्फा’ या चित्रपटातही मुख्य भूमिकेत झळकणार असून, हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : mParivahan App: कुठेही प्रवास करताना ड्रायव्हिंग लायसन्स ठेवण्याची चिंता मिटली, आता हे' अॅप मोबईलमध्ये ठेवा