Tuesday, November 11, 2025 10:45:31 PM

Parineeti Chopra Hospitalized: परिणीती चोप्रा रुग्णालयात दाखल; काही वेळातचं होऊ शकते प्रसूती

परिणीती आज, रविवारी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली असून डॉक्टरांनी तिला निरीक्षणाखाली ठेवले आहे. अभिनेत्रीची संपूर्ण काळजी सध्या तिचे पती राघव घेत आहेत.

parineeti chopra hospitalized परिणीती चोप्रा रुग्णालयात दाखल काही वेळातचं होऊ शकते प्रसूती

Parineeti Chopra Hospitalized: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचे पती, आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा, लवकरच पालक होणार आहेत. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, परिणीती आज, रविवारी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली असून डॉक्टरांनी तिला निरीक्षणाखाली ठेवले आहे. अभिनेत्रीची संपूर्ण काळजी सध्या तिचे पती राघव घेत आहेत. त्यामुळे आता पुढील काही तासांत त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, परिणीती काही दिवसांपूर्वी दिल्लीला रवाना झाली होती. ती आपल्या सासरच्या घरीच पहिल्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आहे. चढ्ढा कुटुंबात नव्या सदस्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असून, दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा - Punha Shivajiraje Bhosale Movie: ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कामापासून काही काळ दूर राहून परिणीतीने तिच्या गरोदरपणाचा काळ आनंदाने व्यतीत केला आहे. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात तिने तिच्या 'पिझ्झा आणि लोणचं' या गरोदरपणातील क्रेव्हिंगबद्दल सांगितले. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला होता. 

हेही वाचा - ‘Qubool hai x3’ म्हणत झायरा वसीमने शेअर केले दोन फोटो; ‘दंगल’ फेम अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न?

दरम्यान, परिणीतीने अलीकडेच स्वतःचे व्ह्लॉगिंग यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे, जिथे ती तिच्या वैयक्तिक आयुष्याचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करते. परिणीती आणि राघव चड्ढा यांनी 24 सप्टेंबर 2023 रोजी राजस्थानमध्ये विवाह केला होता. हा सोहळा अत्यंत खास आणि कौटुंबिक स्वरूपात पार पडला. लग्नाला बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील निवडक मान्यवर उपस्थित होते. लग्नाच्या एक वर्षानंतरच हे जोडपे पालकत्वाच्या नव्या प्रवासात प्रवेश करत आहे. 
 


सम्बन्धित सामग्री