Wednesday, July 09, 2025 09:10:27 PM

रुपाली गांगुलीच्या 'अनुपमा' शोच्या सेटवर भीषण आग; कोट्यवधींचा माल जळून खाक

सोमवारी सकाळी गोरेगाव फिल्म सिटीमध्ये 'अनुपमा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

रुपाली गांगुलीच्या अनुपमा शोच्या सेटवर भीषण आग कोट्यवधींचा माल जळून खाक

मुंबई: सोमवारी सकाळी गोरेगाव फिल्म सिटीमध्ये 'अनुपमा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सूत्रांनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. माहितीप्रमाणे, ही आग सुमारे 5 वाजता लागली. मात्र, 7 वाजताची शिफ्ट असल्याने सेटवर सुरक्षारक्षक आणि काही लोक सोडले तर कोणतेही कलाकार आणि कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या आगीमुळे सेटचे मोठे नुकसान झाले आहे.

'या' शोच्या सेटवरही आग लागली होती:

मालिकेच्या सेटवर आग लागण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 2023 मध्ये स्टार प्लसवरील प्रसिद्ध टीव्ही मालिका 'गुम है किसी के प्यार में' च्या सेटवर आग लागली होती आणि त्या आगीत संपूर्ण सेट जळून खाक झाला होता.

हेही वाचा: मुलाच्या डोक्यात दगड टाकून वडिलांनी केली मद्यपी मुलाची हत्या

'अनुपमा' टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका:

स्टार प्लसवरील टीव्ही मालिका 'अनुपमा' ही टीव्हीवरील सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका आहे. या शोमध्ये रूपाली गांगुली मुख्य भूमिकेत आहे. हा शो अनेकदा टीआरपी यादीत नंबर वन राहतो. 'अनुपमा' या मालिकेत रूपाली गांगुली मुख्य भूमिकेत असून सुधांशू पांडे, मदालसा शर्मा, गौरव खन्ना, पारस कालनावत, आशिष मेहरोत्रा आदी कलाकार महत्वाची भूमिका साकारत आहेत.


सम्बन्धित सामग्री