Alia Bhatt: ‘बेबी…!’ वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिला सुखद धक्का; ‘राहा’नंतर नव्या पाहुण्याचं आगमन?

आलिया भट्टने आज आपल्या 33 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत चाहत्यांना एक मोठी गोड बातमी दिली आहे.

Alia Bhatt: ‘बेबी…!’ वाढदिवशीच आलिया भट्टने चाहत्यांना दिला सुखद धक्का; ‘राहा’नंतर नव्या पाहुण्याचं आगमन?

Alia Bhatt: बॉलीवूडची ‘गंगुबाई’ म्हणजेच आलिया भट्टने आज आपल्या 33 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत चाहत्यांना एक मोठी गोड बातमी दिली आहे. सोशल मीडियावर “बेबी झाला!” अशी पोस्ट करत तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, हे ‘बेबी’ आलियाचे दुसरे अपत्य नसून, तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे.

‘इटरनल किड्स’चे लाँच
आलिया भट्टने तिचे प्रोडक्शन हाऊस ‘इटरनल सनशाईन’ (Eternal Sunshine) अंतर्गत ‘इटरनल किड्स’ (Eternal Kids) हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणाली, “आमच्या प्रोडक्शन हाऊसला नुकतंच बाळ झालं आहे. ‘इटरनल किड्स’ला हॅलो म्हणा!” आलियाने या प्रकल्पाला आपले नवीन ‘बेबी’ मानले असून, याद्वारे ती लहान मुलांसाठी खास आशय (Content) घेऊन येणार आहे.

आजोबांच्या गोष्टी आणि 3 नवीन प्रोजेक्ट्स
आलियाने केवळ प्रकल्पाची घोषणाच केली नाही, तर लवकरच ‘C’, ‘G’ आणि ‘M’ या अक्षरांनी सुरू होणारे तीन मोठे प्रोजेक्ट्स येणार असल्याचेही सांगितले. हा प्रकल्प आलियाचे आजोबा आणि तिने बालपणी ऐकलेल्या गोष्टींवर आधारित आहे. ज्या गोष्टी ऐकत आलिया आणि तिची बहीण शाहीन मोठ्या झाल्या, त्याच गोष्टी आता नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा तिचा मानस आहे.

हेही वाचा – Anushka Shetty Wedding: प्रभास नाही, तर ‘हा’ व्यक्ती होणार देवसेनाचा जोडीदार; 44 व्या वर्षी अनुष्का शेट्टी अडकणार विवाहबंधनात?

नेमका उद्देश काय?
‘इटरनल किड्स’च्या माध्यमातून लहान मुलांसाठी मनोरंजक आणि शैक्षणिक कंटेट तयार केला जाणार आहे. केवळ व्हिडिओच नाही, तर भविष्यात मुलांसाठी गोष्टींची पुस्तके प्रकाशित करण्याचीही आलियाची योजना आहे. “प्रत्येकाच्या आत दडलेल्या लहान मुलाला पुन्हा त्या बालपणात नेणे,” हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे तिने नमूद केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number