Bhushan Pradhan: ‘मन हे त्याचे तिला शोधत राही…’; भूषण प्रधानने अखेर त्याच्या ‘स्वप्नसुंदरी’चं नाव सांगितलं; थेट फोटो केला पोस्ट

भूषण प्रधानच्या ‘सेव्ह द डेट’ पोस्टमुळे लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Bhushan Pradhan: ‘मन हे त्याचे तिला शोधत राही…’; भूषण प्रधानने अखेर त्याच्या ‘स्वप्नसुंदरी’चं नाव सांगितलं; थेट फोटो केला पोस्ट

Bhushan Pradhan: मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी होता. सोशल मीडियावर त्याने शेअर केलेल्या ‘सेव्ह द डेट’ पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि संभ्रम दोन्ही निर्माण झाले होते. रोमँटिक अंदाजात शेअर केलेल्या फोटोमुळे भूषण लग्नबंधनात अडकणार का, असा सवाल अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र आता या चर्चेवर पूर्णविराम मिळाला असून या पोस्टमागचं खरं कारण समोर आलं आहे.

भूषण प्रधानच्या या चर्चित पोस्टचा संबंध त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी नसून आगामी चित्रपटाशी असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘स्वप्नसुंदरी’ नावाच्या नव्या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून त्यात भूषणसोबत अभिनेत्री सायली पाटील दिसत आहे. पोस्टरमध्ये दोघांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस 6 मराठीला मिळाले 5 फायनलिस्ट! बिग बॉसच्या ट्वीस्टने संपला ‘या’ सदस्याचा प्रवास

पोस्टरमधील दृश्य पाहता चित्रपटाची कथा भावनांनी भरलेली आणि प्रेमाच्या सूक्ष्म छटांना स्पर्श करणारी असणार, अशी झलक मिळते. निसर्गाच्या सान्निध्यात दाखवलेली ही जोडी एक वेगळाच अनुभव देत असल्याचं जाणवतं. सायली पाटीलचा साधा पण आकर्षक लूक आणि भूषणचा सहज अभिनय यामुळे ही जोडी प्रेक्षकांना भावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘स्वप्नसुंदरी’ या चित्रपटाच्या नावावरूनच कथा एका खास व्यक्तीच्या शोधाभोवती फिरणारी असल्याचं दिसून येतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते, जिच्यासोबत आपली स्वप्नं जोडलेली असतात. त्या शोधाचा, त्या नात्यांच्या प्रवासाचा आणि भावनिक चढ-उतारांचा हा सिनेमा असल्याचं संकेत मिळत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Namdeo Dhasal Biopic: विद्रोही कवी नामदेव ढसाळांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर! ललित प्रभाकरचा दमदार लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला

या चित्रपटाचं दिग्दर्शन अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी केलं असून निर्मिती रेडबेल मीडिया यांनी केली आहे. चित्रपटाच्या कथेतून प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांची आठवण होईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. प्रेम, नातं आणि आयुष्यातील शोध या सगळ्यांचा संगम या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

‘सेव्ह द डेट’ पोस्टमुळे निर्माण झालेला गोंधळ आता दूर झाला असला, तरी या संपूर्ण घटनेमुळे चित्रपटाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. सोशल मीडियावर भूषणच्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रिया आणि चर्चांमुळे चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

हा चित्रपट येत्या 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना एक वेगळी आणि भावनिक सफर अनुभवायला मिळणार आहे. भूषण प्रधानच्या चाहत्यांसाठी ही एक खास ट्रीट ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number