Monday, March 09, 2026 01:59:11 AM

Ranveer Singh Threat : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी; व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे केली कोट्यवधींची मागणी

अज्ञात इसमाने व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइस नोटद्वारे अभिनेत्याकडे कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितली आहे. ही बाब समोर येताच मुंबई पोलिसांनी तातडीने तपासाला गती दिली आहे.

ranveer singh threat  बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे केली कोट्यवधींची मागणी

Ranveer Singh Threat : 'धुरंधर' चित्रपटाच्या यशाचे शिखर सर करणाऱ्या रणवीर सिंगच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अलिकडेच प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ माजली असतानाच, आता रणवीर सिंगला धमकीचा संदेश मिळाला आहे. अज्ञात इसमाने व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइस नोटद्वारे अभिनेत्याकडे कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितली आहे. ही बाब समोर येताच मुंबई पोलिसांनी तातडीने तपासाला गती दिली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, रणवीर सिंगला एका व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइस नोटद्वारे धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमध्ये मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली असून, मागणी पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अद्याप रणवीर सिंग किंवा त्याच्या अधिकृत टीमने पोलिसांत औपचारिक तक्रार दाखल केली नसली तरी, पोलिसांनी स्वतःहून धमकी पाठवणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

'धुरंधर'च्या यशाचा डंका आणि सिक्वेलची तयारी
रणवीर सिंग सध्या त्याच्या 'धुरंधर' या अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटामुळे चर्चेत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीरने 'हमजा' नावाच्या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली असून, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध झाला आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहता 'धुरंधर'चा दुसरा भाग देखील तयार असून, तो 19 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या यशाच्या आनंदात असतानाच धमकीचे सत्र सुरू झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा - Check Bounce Case : राजपाल यादवच्या मदतीसाठी सोनू सूद सरसावला; चॅरिटीऐवजी 'ही' खास ऑफर देऊन जपली प्रतिष्ठा

'डॉन 3' चा वाद आणि 40 कोटींची भरपाई?
दुसरीकडे, रणवीर सिंग 'डॉन 3' मधून अचानक बाहेर पडल्याच्या चर्चेमुळे एका नव्या वादात अडकला आहे. मिळालेल्या वृत्तांनुसार, रणवीरने मध्येच चित्रपट सोडल्यामुळे निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 'एक्सेल एंटरटेनमेंट'ने या नुकसानाची भरपाई म्हणून रणवीरकडे अंदाजे 40 कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, रणवीरने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, आपण कोणत्याही देयकासाठी जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या वादामुळे 'डॉन 3' चे काम सध्या थांबले असून रणवीरची जागा हृतिक रोशन घेणार असल्याची अफवा देखील पसरली आहे.


सम्बन्धित सामग्री