नाना पाटेकरांचा खरचं मृत्यू झालायं का?…डेडबॉडी कुणी पाहिली का?; तनुश्री दत्ता पुन्हा बरळली

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.
Tanushree Dutta Nana Patekar
Tanushree Dutta Nana Patekar

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. तिने त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, त्यांनी मृत्यूचे नाटक केले असावे, असा आरोपही केला आहे. इन्स्टाग्राम लाईव्ह सत्रादरम्यान तिने या ज्येष्ठ अभिनेत्याला देण्यात आलेल्या शासकीय सन्मानावर प्रश्न उपस्थित केले. तसेच विविध देशांमध्ये त्यांच्यावर पोलीस कारवाईची मागणी केली. याशिवाय, त्यांच्या कथित लष्करी सेवेबाबत आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या समाजकार्याबाबतही तिने आरोप केले आहेत.

हेही वाचा : इलेक्ट्रिक कार डिव्हायडरला धडकली, क्षणार्धात उडाला आगीचा भडका; एकाच कुटुंबातील 4 जणांचा होरपळून मृत्यू

लाईव्ह सत्रादरम्यान, तनुश्रीने नानांच्या मृत्यूच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि अधिकृत माहितीबद्दल शंका व्यक्त केली. तिने असा दावा केला की, प्रसारमाध्यमांमधील वृत्तांकनात तिला त्यांचा मृतदेह किंवा चेहरा दिसला नाही. शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याबाबतच्या प्रक्रिया आणि आवश्यक परवानग्यांचा संदर्भ देत ती म्हणाली, “त्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया असते आणि परवानगीची कागदपत्रे (परमिशन स्लिप) जारी केली जातात.” तसेच, अंत्यसंस्कारासाठी बॉलीवूडमधील सेलिब्रिटींना का बोलावले गेले नाही, असा प्रश्नही तिने उपस्थित केला आणि या संपूर्ण प्रकरणातील परिस्थितीची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे सुचवले.

तनुश्रीने असा आरोप केला की, ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले तो नानाचा नव्हता. तिने असा अंदाज व्यक्त केला की तो सिंगापूर किंवा मलेशियामध्ये जिवंत असू शकतो. “तिथे खरा मृतदेह नव्हता. खरा मृतदेह कदाचित सिंगापूर किंवा मलेशियामध्ये आहे. तो जिवंत आहे,” असा दावा तिने केला. त्यानंतर या अभिनेत्रीने सिंगापूर, मलेशिया आणि यूएई (UAE) यांसारख्या अनेक देशांमधील पोलिसांना यात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. “मी सिंगापूर आणि मलेशियाच्या पोलिसांना विनंती करू शकते का की, या व्यक्तीला पाहताच गोळ्या घालाव्यात. ज्याने स्वतःच्या मृत्यूचे नाटक केले आणि बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून तो पळून गेला आहे. याचा अर्थ असा की तो कायद्याने दोषी ठरलेला आणि फरार झालेला गुन्हेगार आहे,” असे ती म्हणाली. नानाने कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचे नाटक केले असल्याचा आरोप करत, तनुश्रीने सिंगापूर, मलेशिया, यूएई आणि सुदानमधील प्रशासनाला ‘लुकआउट नोटीस’ जारी करण्याचे आवाहनही केले. तसेच, जर त्याने आपले रूप बदलले असेल. तर त्याची डीएनए (DNA) चाचणी केली जावी, असेही तिने सुचवले.

दरम्यान, हे दावे अद्याप सिद्ध झालेले नाहीत. अधिकृत अहवालांनुसार, 8 ऑक्टोबर 2026 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने नाना पाटेकर यांचे निधन झाले आणि पुण्याजवळील डोंजे येथील त्यांच्या फार्महाऊसवर पूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच ‘लाईव्ह’ सत्रात, तनुश्रीने नानांचा लष्कराशी कथित संबंध असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्याबाबतचा लेखी पुरावा सादर करण्याची मागणी केली. “जर त्यांची लष्करामध्ये भरती झाली असती, तर त्यांच्याकडे पगाराच्या पावत्या (सॅलरी स्लिप्स) असायला हव्या होत्या. तपासा… अगदी कुख्यात गुंडही ‘मी लष्करात होतो’ असे एवढे मोठे खोटे बोलत नाहीत,” असे म्हणत तिने नानांनी दिलेल्या कथित परीक्षांची माहिती, त्यांनी सेवा बजावलेली बटालियन आणि उपलब्ध असलेले सेवा किंवा वेतनविषयक रेकॉर्ड्स यांची मागणी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version