Chhaava OTT Release Date : विक्की कौशलचा ‘छावा’ लवकरच OTT वर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल
Chhaava OTT Release Date : बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजत आहे. ऐतिहासिक कालखंडावर आधारित हा सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तुफान कमाई करत बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम प्रस्थापित केले. अवघ्या काही आठवड्यांतच चित्रपटाने ५०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. मोठ्या पडद्यावर यश मिळवल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, छावा हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. थिएटर रिलीजनंतर साधारणतः दोन महिन्यांनी बरेच चित्रपट ओटीटीवर येतात. त्यानुसार, ११ एप्रिल २०२५ रोजी छावा नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे. पण अद्याप चित्रपटाच्या निर्मात्यांकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
संभाजी महाराजांची गाथा मोठ्या पडद्यावर
छावा हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. संभाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे युद्ध कौशल्य आणि त्याग यांचा वेध या चित्रपटात घेण्यात आला आहे. विकी कौशल याने संभाजी महाराजांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. त्याच्या दमदार अभिनयाची दखल प्रेक्षकांनी घेतली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना हिने संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई यांची भूमिका साकारली आहे. तर अक्षय खन्ना याने मुगल सम्राट औरंगजेब याची भूमिका साकारली आहे.
हेही वाचा - Friday OTT Releases: 'या' आठवड्यात होणार मनोरंजनाचा धमाका! ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहा नवनवीन चित्रपट
विकी कौशल याने मसान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर उरी: द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटामुळं त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सॅम बहादूर, संजू, जरा हटके जरा बचके यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांमध्ये आपली छाप सोडली आहे.
हेही वाचा - युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या नात्याचा निर्णय 'या' दिवशी होणार; घटस्फोटानंतर क्रिकेटपटू पूर्व पत्नीला देणार 'इतकी' पोटगी
विकी कौशलच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास, विकीने बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिच्याशी लग्न केलं आहे. विकी-कॅटची जोडी नेहमी चर्चेत असते. दोघांनी कुंभमेळ्याला देखील हजेरी लावत गंगा स्थान केलं होतं.