Saturday, June 06, 2026 10:48:23 AM

Deepika Padukone Pregnant Again : दीपिका आणि रणवीर पुन्हा होणार आई-बाबा; सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिली गोड बातमी

दीपिकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही सुखद बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. या पोस्टनंतर काही वेळातच जगभरातील चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे.

deepika padukone pregnant again  दीपिका आणि रणवीर पुन्हा होणार आई-बाबा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिली गोड बातमी

Deepika Padukone Announces Second Pregnancy : बॉलिवूड चित्रपटातून 'मस्तानी'ची भूमिका अजरामर करणारी दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या घरात पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. दीपिकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही सुखद बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. विशेष म्हणजे, तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांची चिमुकली मुलगी दुआ हिच्या हातात 'प्रेग्नंसी टेस्ट किट' दिसत असून त्यावर पॉझिटिव्ह खुणा स्पष्टपणे उमटल्या आहेत. या पोस्टनंतर अवघ्या काही वेळातच जगभरातील चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. 

लग्नाच्या 8 वर्षांनंतर दुसऱ्या अपत्याचे आगमन
दीपिका आणि रणवीर यांचा विवाह 15 नोव्हेंबर 2018 रोजी झाला होता. लग्नाच्या 6 वर्षांनंतर, म्हणजेच 8 सप्टेंबर 2024 रोजी त्यांना पहिली मुलगी 'दुआ' झाली. आता लग्नाला 8 वर्षे पूर्ण होत असताना हे जोडपे आपल्या दुसऱ्या अपत्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. या गुड न्यूजमुळे आता दीड वर्षांची झालेली दुआ लवकरच 'मोठी ताई' होणार आहे. अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूने देखील हार्ट इमोजी शेअर करत या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा - Sharad Ponkshe: 'एक लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल...'; अभिनेते शरद पोंक्षे यांचं रोखठोक विधान

आता कळलं धुरंधरच्या प्रमोशनपासून दूर राहण्याचं कारण
गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह त्याच्या 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) या सिनेमाच्या यशामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत, मात्र दीपिका कोणत्याही प्रमोशनमध्ये किंवा कार्यक्रमात दिसत नसल्याने चर्चांना उधाण आले होते. आज 19 एप्रिल 2026 रोजी दीपिकाने आपली दुसरी प्रेग्नंसी जाहीर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तिच्या या घोषणेमुळे ती सार्वजनिक कार्यक्रमांपासून का लांब होती, याचे उत्तर चाहत्यांना मिळाले आहे.

शुटिंगच्या वेळेवरून झाला होता गदारोळ
आई झाल्यानंतर दीपिकाने आपल्या कामाच्या पद्धतीत मोठे बदल केले होते. तिने निर्मात्यांकडे दिवसाला केवळ 8 तास शूटिंग करण्याची अट ठेवली होती. या निर्णयामुळे बॉलिवूडमध्ये बराच वाद निर्माण झाला होता आणि दीपिकाला काही मोठे सिनेमेही सोडावे लागले होते. मात्र, अनेक सेलिब्रिटींनी तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला होता. आता दुसऱ्यांदा आई होणार असल्याने दीपिका तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये आणखी काय बदल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Rakhi Sawant: 'लग्न नको, पण...', बिग बॉसच्या घराबाहेर येताच राखीची राकेश बापट कडे अजब मागणी


सम्बन्धित सामग्री