Dhurandhar 2: दाऊद इब्राहिम समजून व्हायरल झालेला फोटो निघाला फेक; फोटोतील व्यक्ती कोण? धक्कादायक सत्य समोर

सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असलेला ‘धुरंधर 2’ चित्रपट विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे.

Dhurandhar 2: दाऊद इब्राहिम समजून व्हायरल झालेला फोटो निघाला फेक; फोटोतील व्यक्ती कोण? धक्कादायक सत्य समोर

Dhurandhar 2: सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असलेला ‘धुरंधर 2’ चित्रपट विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहे. चित्रपटातील दमदार कथा, मोठा स्टारकास्ट आणि अंडरवर्ल्डशी संबंधित कथानकामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे. मात्र, या चित्रपटातील एका सीनमुळे सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चांना उधाण आले होते. ‘बडे साहब’ या पात्राशी संबंधित एका फोटोने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती.

चित्रपटातील एका दृश्यात वृद्ध अवस्थेतील ‘बडे साहब’ दाखवण्यात आले आहेत. त्या सीनमध्ये त्यांच्या मागे एक फोटो दिसतो, ज्याबाबत अनेकांनी तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा असल्याचा दावा केला. हा फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आणि अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली. काहींनी तर हा फोटो खरा असल्याचं मानून त्यावर टीकाही केली.

हेही वाचा: Salman Khan On Rajpal Yadav: '30 वर्षांचे काम आणि कलेची किंमत…'; राजपाल यादवसाठी सलमान खानने ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर

मात्र, या सगळ्या चर्चांवर आता पूर्णविराम लागला आहे. या फोटोबाबत स्वतः अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे. ‘बडे साहब’च्या तरुण वयातील फोटो म्हणून दाखवण्यात आलेली इमेज ही प्रत्यक्षात दाऊद इब्राहिमची नसून, ती अभिनेता दानिश इक्बाल यांचीच असल्याचं समोर आलं आहे. या खुलाशानंतर सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांना अखेर आळा बसला आहे.

दानिश इक्बाल यांनी सांगितलं की, हा लूक तयार करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. परफेक्ट लूक मिळवण्यासाठी त्यांना जवळपास तीन तास मेकअप रूममध्ये बसावं लागलं. त्या फोटोसाठी विशेष मेकअप, हेअरस्टाइल आणि लाईटिंगचा वापर करण्यात आला होता. त्यामुळेच तो फोटो इतका वास्तव वाटला आणि लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.

हेही वाचा: Tatiri Song Controversy: रॅपर बादशाहकडून 'टटीरी' गाण्याबद्दल लेखी माफी; 50 मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

हा फोटो समोर आल्यानंतर केवळ प्रेक्षकांमध्येच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्या होत्या. काहींनी या फोटोवरून प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, आता चित्रपटाच्या टीमने आणि अभिनेत्याने स्पष्ट केल्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

‘धुरंधर 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही दमदार कामगिरी केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत 1500 कोटींच्या जवळपास कमाई केल्याची चर्चा आहे. एका छोट्याशा सीनमुळे इतकी मोठी चर्चा निर्माण होणे, हे या चित्रपटाच्या लोकप्रियतेचेच द्योतक मानले जात आहे.

‘बडे साहब’च्या व्हायरल फोटोमुळे निर्माण झालेला गोंधळ आता दूर झाला असला, तरी या घटनेमुळे चित्रपटाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. सोशल मीडियाच्या युगात एका फोटोमुळे कशी चर्चा रंगू शकते, याचं हे उत्तम उदाहरण ठरलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number