Tuesday, November 18, 2025 03:36:15 AM

Rishabh Tondon: गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन (फकीर) याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; संगीतविश्वात शोककळा

गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन उर्फ फकीर याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ‘ये आशिकी’ गाण्यामधून त्याने लोकप्रियता मिळवली होती.

rishabh tondon गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन फकीर याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन संगीतविश्वात शोककळा

गायक, संगीतकार आणि अभिनेता म्हणून ओळखला जाणारा ऋषभ टंडन (Rishabh Tandon) उर्फ फकीर याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. छायाचित्रकार विरल भयानी यांनी त्याच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ काही दिवसांपासून आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी दिल्लीला आला होता, तेव्हाच ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्या एका निकटवर्तीय मित्राने सांगितले की, अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

वृत्तांनुसार, ऋषभ टंडनचा काल रात्री उशिरा दिल्लीमध्ये मृत्यू झाला. त्याच्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये ‘ये आशिकी’, ‘चांद तू’, ‘धू धू करके’, ‘फकीर की जुबानी’ यांचा समावेश आहे. त्याने आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात 2008 मध्ये टी-सीरीजच्या ‘फिर से वही’ या अल्बमद्वारे केली होती. त्याच्या निधनामुळे संगीतविश्वात आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर त्याच्या आठवणी शेअर करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ऋषभ टंडन हा मुंबईस्थीत गायक, संगीतकार आणि अभिनेता होता. त्याच्या शांत स्वभावामुळे आणि संगीताबद्दलच्या आस्थेमुळे तो सर्वत्र लोकप्रिय होता. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये त्याने स्वतःचे वर्णन असे केले होते, “A believer, possessed by the energies of Shiva … Singer | Composer | Actor.”

हेही वाचा: Shilpa Shetty Bastian Earning : शिल्पा शेट्टी बॅस्टियन रेस्टॉरंटमधून कमावते कोट्यावधी ; या व्यक्तीने केली पोलखोल

त्याने ‘Faqeer - Living Limitless’ आणि ‘Rashna: The Ray of Light’ या प्रकल्पांत भूमिका साकारली होती. कलाक्षेत्राच्या पलीकडे, ऋषभ हा प्राणीप्रेमी म्हणूनही ओळखला जात होता. मुंबईतील त्याच्या घरी पत्नीसह आणि अनेक मांजरे, कुत्रे तसेच पक्ष्यांसोबत तो राहत होता.

त्याच्या निधनानंतर अशी माहिती समोर आली आहे की, ऋषभकडे अनेक अप्रकाशित गाणी तयार होती, ज्यावर तो निधनापूर्वी काम करत होता. त्याच्या चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर भावनिक श्रद्धांजली वाहत, त्याला एक प्रेमळ आणि हरहुन्नरी कलाकार असे म्हटले आहे.

ऋषभ टंडनने 2019 मध्ये आपल्या रशियन पत्नी ओलेस्या नेडोबेगोव्हा (Olesya Nedobegova) सोबत विवाह केला होता. ओलेस्या त्याच्या काही म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली होती. त्याच्या अचानक झालेल्या निधनाने संगीतसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

हेही वाचा: New Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षमतावाढीला हिरवा कंदील; दरवर्षी 9 कोटी प्रवाशांची वर्दळ अपेक्षित


सम्बन्धित सामग्री