Monalisa-Farman Viral Video : प्रेमात फसवणूक? लग्नानंतर पाच दिवसातच झाली वाईट अवस्था, फरमानचा धक्कादायक व्हिडीओ समोर

लग्नानंतर अवघ्या 5 दिवसांतच फरमान खानचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. फाटके कपडे आणि खांबावर डोके आपटणाऱ्या फरमानला पाहून...

Monalisa-Farman Viral Video : प्रेमात फसवणूक? लग्नानंतर पाच दिवसातच झाली वाईट अवस्था, फरमानचा धक्कादायक व्हिडीओ समोर

Monalisa-Farman Love Story New Twist : कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आणि तिचा पती फरमान खान यांच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. लग्नानंतर अवघ्या 5 दिवसांतच फरमान खानचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली होती. विसकटलेले केस, फाटके कपडे आणि खांबावर डोके आपटणाऱ्या फरमानला पाहून चाहत्यांना वाटले की, त्यांच्या आयुष्यात काहीतरी धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र, या व्हिडिओमागचे सत्य आता समोर आले असून ते फरमानच्या व्यावसायिक आयुष्याशी संबंधित आहे.

व्हायरल व्हिडिओ आणि मानसिक संतुलनाविषयीचा ‘तो’ दावा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये फरमान खान अत्यंत हलाखीच्या अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्याचा हात आणि पाय मोडलेला असून तो रस्त्यावरील कचरा खातानाही चित्रित झाला आहे. या व्हिडिओवर “जर तुला वाटतं की मी असा होऊ नये, तर प्लीज मला ‘धोखा’ देऊ नको” असे लिहिले होते. यामुळे अनेकांना वाटले की फरमानचे मानसिक संतुलन बिघडले आहे. मात्र, तपासाअंती असे समोर आले की, हा व्हिडिओ 4 नोव्हेंबर 2025 सालचा म्हणजेच जुना आहे. फरमान हा एक अभिनेता असून त्याने प्रेमात धोका मिळालेल्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. फरमानने अनेक दाक्षिणात्य आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मोनालिसा आणि फरमानची ‘फिल्मी’ लव्ह स्टोरी
मोनालिसा आणि फरमान यांची भेट केरळमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. अवघ्या 6 महिन्यांच्या ओळखीनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, मोनालिसानेच लग्नासाठी पुढाकार घेतला होता. तिने फरमानला धमकी दिली होती की, जर त्याने तिच्याशी लग्न केले नाही तर ती 2-3 दिवसांत आपला जीव देईल, कारण तिचे घरचे तिचे लग्न दुसऱ्या व्यक्तीशी लावून देत होते. एका मुलीचे आयुष्य वाचवण्यासाठी फरमानने लग्नास होकार दिला आणि हिंदू पद्धतीने मंदिरात विवाह केला.

हेही वाचा – Shraddha Kapoor Marriage : श्रद्धा कपूर अडकणार लग्नबंधनात? राहुल मोदीसोबतच्या नात्यावर मावशी म्हणाली, ‘खरंच…’

लव्ह जिहादच्या आरोपांवर सडेतोड उत्तर
या लग्नानंतर सोशल मीडियावर ‘लव्ह जिहाद’च्या चर्चांना उधाण आले होते. यावर फरमानने स्पष्ट केले की, “माझ्यासाठी सर्व धर्म समान आहेत. जर मला काही चुकीचे करायचे असते, तर मी हिंदू पद्धतीने लग्न का केले असते?” मोनालिसानेही आपला धर्म बदललेला नसल्याचे ठामपणे सांगितले आहे. ती तिचा हिंदू धर्म पाळणार आहे आणि फरमान त्याचा मुस्लिम धर्म पाळणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक टीकाकारांची तोंडे बंद झाली आहेत.

भविष्यातील वाटचाल आणि चाहत्यांची उत्सुकता
फरमान खानने आपण एक कलाकार असल्याचे सांगून या व्हायरल व्हिडिओमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर केला आहे. मोनालिसा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात आनंदी असून, फरमान आपल्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहे. लग्नानंतरच्या या सुरुवातीच्या काळातच त्यांना अनेक वादांना सामोरे जावे लागले असले, तरी दोघांनीही एकमेकांची खंबीरपणे साथ दिली आहे. त्यांच्या लग्नाची ही कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही, अशी दाद त्यांचे चाहते देत आहेत.

हेही वाचा – Dhurandhar 2 : कोण आहे ‘बडे साहब’? ‘धुरंधर 2’ मध्ये अंडरवर्ल्ड डॉनच्या भूमिकेवरून पडदा उठला; या कलाकारानं साकारला दाऊद

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number