Monday, November 17, 2025 06:24:57 AM

Fraud Case: फरहान अख्तरच्या आईची 12 लाखांची फसवणूक; ड्रायव्हर आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

अभिनेता फरहान अख्तर यांच्या आई व ज्येष्ठ पटकथालेखिका हनी इराणी यांची तब्बल 12 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

fraud case फरहान अख्तरच्या आईची 12 लाखांची फसवणूक ड्रायव्हर आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Fraud Case: मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता फरहान अख्तर यांच्या आई व ज्येष्ठ पटकथालेखिका हनी इराणी यांची तब्बल 12 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी हनी इराणींच्या ड्रायव्हर आणि पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेट्रोल कार्डचा गैरवापर करून फसवणूक
पोलिसांच्या माहितीनुसार, ड्रायव्हर नरेश सिंग (वय 35) याने हनी इराणी यांच्या वाहनांसाठी फरहान अख्तरच्या नावाने जारी केलेले पेट्रोल कार्ड गैरप्रकारे वापरले. तो वांद्रे तलावाजवळील पेट्रोल पंपावर कार्ड स्वाइप करायचा आणि पंप कर्मचारी अरुण सिंग (वय 52) त्याला त्यातील रोकड परत देत असे. अशा प्रकारे दोघांनी मिळून सातत्याने फसवणूक केल्याचे आढळले. तथापी, आरोपी 35 लिटर क्षमतेच्या कारसाठी 62 लिटर पेट्रोल दाखवत होता, तसेच सात वर्षांपूर्वी विकलेल्या वाहनासाठीही पेट्रोलचे बिल तयार करून पैसे उकळत होता.

हेही वाचा - Rhea Chakraborty Passport: रिया चक्रवर्तीला 5 वर्षांनंतर परत मिळाला पासपोर्ट; सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत म्हणाली, 'सत्यमेव जयते'

व्यवस्थापकाने दाखल केली तक्रार
हा गैरप्रकार फरहान अख्तर यांच्या व्यवस्थापक दिया भाटिया (वय 36) यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 1 ऑक्टोबर रोजी वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. चौकशीत आरोपीने कबुली दिली की, त्याला हे कार्ड 2022 मध्ये फरहान अख्तरच्या माजी ड्रायव्हरकडून मिळाले होते आणि तेव्हापासून तो नियमितपणे पेट्रोल न भरता दरवेळी 1,000 ते 1,500 इतकी रोकड घेत असे.

हेही वाचा - Rashmika-Vijay Engagement: रश्मिका-विजयचं नातं पुढच्या टप्प्यावर; गुपचूप उरकला साखरपुडा ; 'या' महिन्यात होणार लग्न

फसवणुकीचा गुन्हा नोंद

पोलिसांनी या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 406 (गुन्हेगारी विश्वासघात), 420 (फसवणूक) आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, या फसवणुकीत आणखी कोणी सहभागी आहे का? याचीही चौकशी केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री