Wednesday, January 14, 2026 12:43:36 PM

Gaurav Khanna: गौरव खन्ना झाला मालामाल! बक्षिसाच्या रकमेपेक्षा बिग बॉसची फी जास्त; आठवड्याला घ्यायचा 'इतकी' रक्कम

त्याला विजेतेपदासोबत 50 लाख रुपयांचे रोख पारितोषिकही मिळाले. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे बक्षीसापेक्षा गौरवने शोमधून कमावलेली फी अनेक पटीने जास्त आहे.

gaurav khanna गौरव खन्ना झाला मालामाल बक्षिसाच्या रकमेपेक्षा बिग बॉसची फी जास्त आठवड्याला घ्यायचा इतकी रक्कम

Gaurav Khanna: सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले अफाट रंगतदार ठरला. प्रेक्षकांच्या प्रचंड मतांच्या जोरावर अभिनेता गौरव खन्नाने अंतिम फेरीत फरहाना भट्टला मागे टाकत विजेतेपदाची ट्रॉफी पटकावली. त्याला विजेतेपदासोबत 50 लाख रुपयांचे रोख पारितोषिकही मिळाले. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे बक्षीसापेक्षा गौरवने शोमधून कमावलेली फी अनेक पटीने जास्त आहे.

गौरवची कमाई बक्षिसापेक्षा तब्बल सहापट 

टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा असलेल्या गौरव खन्नाने पहिल्या दिवसापासून घरात प्रवेश करत 15 आठवड्यांचा प्रवास पूर्ण केला. या काळात तो शोमधील सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक ठरला. त्याला आठवड्याला 17.5 लाख रुपये मानधन मिळत होते. ग्रँड फिनालेपर्यंत त्याने केवळ फीमधून जवळपास 2.62 कोटी रुपये कमावले, आणि त्यात विजेतेपदाची 50 लाखांची रक्कम जोडली असता त्याची एकूण कमाई 3 कोटी 12 लाखांवर पोहोचली. ही रक्कम त्याला मिळालेल्या बक्षिसापेक्षा साधारण 6.25 पट जास्त आहे.

हेही वाचा - Farhana Bhatt on Bigg Boss 19 winner : "तो त्या लायक नाही" 'बिग बॉस 19' च्या विजेत्यावर फरहाना भट्टची तिखट प्रतिक्रिया

अभिनयातील प्रवास. मार्केटिंग मॅनेजरपासून सुपरस्टारपर्यंत

गौरव खन्नाची अभिनय कारकीर्द आज जरी तेजीत असली तरी त्याचा प्रवास मार्केटिंग मॅनेजर म्हणून सुरू झाला होता. कानपूरच्या सिव्हिल लाइन्समधील रहिवासी असलेला गौरव शिक्षणानंतर मुंबईत आला आणि त्याने MBA पूर्ण केले. त्यानंतर एका आयटी कंपनीत नोकरी करत असतानाच त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्याने ‘भाभी’, ‘कुमकुम’, ‘मेरी डोली तेरे अंगना’, ‘सीआयडी’, ‘चंद्रकांता’, ‘अनुपमा’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. ‘अनुपमा’ मध्ये अनुज कपाडियाची भूमिका साकारल्यानंतर त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. सुरुवातीला त्याला या मालिकेसाठी दररोज 35 हजार रुपये मानधन मिळत होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्याला मोठी महिला फॅन फॉलोइंग आहे. गौरवने सेलिब्रिटी मास्टरशेफमध्येही सहभाग घेतला होता आणि तो त्या स्पर्धेचाही विजेता ठरला होता. अशा प्रकारे एका वर्षात त्याने दोन मोठ्या रिअॅलिटी शोची ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम केला.

हेही वाचा - Kanika Kapoor : मेगाँग फेस्टिव्हलमध्ये गोंधळ; लाईव्ह कॉन्सर्टमध्ये कनिका कपूरच्या चाहत्यानं थेट...

दरम्यान, प्रणीत मोरे या सीझनचा दुसरा रनर-अप होता. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस 19 मध्ये त्याला दर आठवड्याला 1 ते 2 लाख रुपये मिळाले. 14 आठवड्यांची त्याची कमाई 14 लाख ते 28 लाख रुपयांपर्यंत होती. तथापी, तान्या मित्तल बिग बॉस 19 मध्ये तिसरी रनर-अप होती. तिने दर आठवड्याला 3 लाख रुपये कमावले. 14 आठवड्यांची तिची एकूण कमाई 42 लाख रुपये आहे. बिग बॉस 19 मधील अमाल मलिकच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, त्याने दर आठवड्याला 8.75 लाख रुपये कमावले. त्याची एकूण कमाई 1.31 कोटी रुपये आहे.


सम्बन्धित सामग्री