Yuzvendra Chahal : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या मैदानातील कामगिरीपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळामुळे अधिक चर्चेत आहे. धनश्री वर्माशी घटस्फोट आणि त्यानंतर आरजे महवशसोबतचे नाव जोडले गेल्यानंतर, आता चहल एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत मुंबईत स्पॉट झाला आहे. यामुळे युजवेंद्रच्या आयुष्यात नवीन प्रेमाची एन्ट्री झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
कोण आहे ती अभिनेत्री?
मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटबाहेर युजवेंद्र चहल 'बिग बॉस' फेम अभिनेत्री शेफाली बग्गा हिच्यासोबत स्पॉट झाला. दोघेही एकत्र डिनरसाठी आले होते. मात्र, कॅमेरे पाहताच शेफालीने सावध पवित्रा घेत तिथून काढता पाय घेतला. तिने पापाराझींना कोणतीही पोझ दिली नाही, ज्यामुळे या भेटीबाबतचे गूढ अधिकच वाढले आहे. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
आरजे महवशसोबत ब्रेकअप?
काही महिन्यांपूर्वी चहलचे नाव आरजे महवशसोबत जोडले गेले होते. दोघे परदेशात एकत्र फिरतानाही दिसले होते. मात्र, नुकतेच महवशने सोशल मीडियावर काही सूचक पोस्ट शेअर केल्या आणि दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले. यामुळे त्यांच्यातील नाते संपुष्टात आल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महवशच्या जागी आता शेफाली बग्गाची एन्ट्री झाल्याची चर्चा बॉलिवूड आणि क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा - Palash Muchhal: 40 लाखांच्या फसवणुकीच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर! पलाश मुच्छलने खोट्या आरोपांवर ठोकला तब्बल इतक्या कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
धनश्रीसोबतच्या घटस्फोटाची पार्श्वभूमी
दरम्यान, 2025 मध्ये युजवेंद्र आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला. सुमारे 18 महिने वेगळे राहिल्यानंतर त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला होता. मुंबईत स्थायिक होण्यावरून त्यांच्यात मतभेद असल्याचे बोलले जाते. घटस्फोटावेळी धनश्रीने मोठी पोटगी घेतल्याचीही चर्चा होती. या सर्व चढ-उतारांनंतर चहल आता आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करत असल्याचे दिसत आहे.