Pawan Chaure On Gautami Patil: पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नावावर असलेल्या कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक सामाजी मरगळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर गौतमी आणि तिच्या गाडीतील लोकांनी दाखवलेल्या अमानुष वृत्तीमुळे समाजामध्ये संताप पसरला आहे.
अभिनेता पवन चौरेने या प्रकरणावर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. त्याने गौतमी पाटीलवर थेट आरोप करत म्हटले, 'गौतमी पाटील, तू महाराष्ट्राचा बिहार केलास हे तर खरंच आहे. मग आता तू गरीब जनतेलाही त्रास द्यायचा ठेका घेतला आहेस का? तुझी गाडी एका रिक्षाला उडवते आणि तू पळून जातेस! पोलीस पोहोचण्याआधी गाडी उचलली जाते, याचा अर्थ प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. रिक्षाचालक सध्या व्हेंटिलेटरवर आहे आणि चार दिवसानंतरही गौतमीने त्यांची विचारपूस केली नाही.'
हेही वाचा - Sandhya Shantaram: 'पिंजरा' फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन; 97व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
रिक्षाचालकाच्या नातेवाइकांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी तत्काळ पोलीस उपायुक्तांना फोन करून स्पष्ट आदेश दिले की, कारमधील चालकाची ओळख पटवावी. त्याला अटक करावी आणि गाडी ताब्यात घेण्यात यावी. तसेच रिक्षाचालकाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च गौतमीकडून वसूल करावा.
हेही वाचा - Rashmika-Vijay Engagement: रश्मिका-विजयचं नातं पुढच्या टप्प्यावर; गुपचूप उरकला साखरपुडा ; 'या' महिन्यात होणार लग्न
दरम्यान, पोलिसांनी गौतमी पाटीलला कायदेशीर सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात दोषींवर काय कारवाई होते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.