मुंबई: 2000 साली प्रसिद्ध हिंदी रिमेक 'काटा लगा' गाण्यातून तमाम रसिक-प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मॉडेल आणि अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचं 27 जून रोजी वयाच्या 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुरुवातीला असे म्हटले जात होते की तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. नंतर, पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने शेफालीच्या घराची तपासणी केली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
हेही वाचा: RAVINDRA CHAVAN: भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड
पोलिस तपासात शेफालीच्या मृत्यूबद्दल अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. तिने फ्रीजमधून शिळे अन्न खाल्ले होते. त्यानंतर ती खाली पडली असा जबाब तिचा पती पराग त्यागीने पोलिसांकडे नोंदवला. शेफाली जरीवालाच्या घरी वृद्धत्वविरोधी गोळ्या आणि व्हिटॅमिन गोळ्यांचे दोन बॉक्स सापडले होते. ती डॉक्टरांचा सल्ला न घेता गोळ्या घेत होती. पण, 'याचा तिला कोणताही त्रास झाला नव्हता', असे तिच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. शेफालीशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली. इतकंच नाही, तर कुटुंबीयांपासून ते घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. यादरम्यान, शेफालीच्या पतीला म्हणजेच पराग त्यागीलाही चौकशी करण्यासाठी बोलावण्यात आले होते. 'ज्या दिवशी शेफालीचा मृत्यू झाला, त्या दिवशी तिचा नवरा पराग याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी मी खूप घाबरले होते', शेफालीची मैत्रीण पूजा घई म्हणाली. 'परागकडे शोक करायलाही वेळ नव्हता. तो सतत पोलिसांच्या रडारवर होता. परागला ज्या क्षणी मी पाहिले, तेव्हा मला आशा होती की तो लवकरात लवकर या परिस्थितीतून बाहेर येईल, सुदैवाने अहवालात कोणताही गैरप्रकार उघड झाला नाही आणि परागला सोडण्यात आले', असे वक्तव्य पूजा घईने केले.