Thursday, July 17, 2025 02:58:51 AM

RAVINDRA CHAVAN: भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड

भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी सोमवारी बिनविरोध निवड झाली. मंगळवारी सायंकाळी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात चव्हाण यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

ravindra chavan भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड

मुंबई: भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी सोमवारी बिनविरोध निवड झाली. प्रदेशाध्यक्षपदासाठी चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली असून, केंद्रीय नेतृत्वाकडून निवडीची औपचारिक घोषणा मंगलवारी झाली. प्रदेशाध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया झाली. मंगळवारी सायंकाळी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात चव्हाण यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित होते. 

मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राज्यात भाजपचा एक प्रदेशाध्यक्ष असावा, अशी भावना व्यक्त केली जात होती. ज्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासाठी योग्य चेहऱ्याचा शोध सुरू होता. अशातच, रवींद्र चव्हाण हे आधीच महाराष्ट्र भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होते. त्यामुळे भाजपमध्ये एकमत होते की प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण योग्य व्यक्ती आहेत. नियोजनानुसार, प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी रवींद्र चव्हाण यांचे नाव दिल्लीला पाठवण्यात आले. तसेच, या निवड प्रक्रियेत इतर कोणत्याही नेत्याने अर्ज न केल्याने मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. 

हेही वाचा: वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता अन् अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार; पुण्याजवळ हे काय घडलं?

काय म्हणाले आशिष शेलार?

आशिष शेलार म्हणाले की, 'रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. रवींद्र चव्हाण हे भाजपचे नावाने बारावे अध्यक्ष असतील. मात्र, ते विरोधकांचे राजकीय तेरावे घालतील, विरोधकांचे बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही', हे विधान मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले.

हेही वाचा: शक्तिपीठ महामार्ग लोकांची की सत्ताधाऱ्यांची गरज? - बच्चू कडू

कोण आहेत रवींद्र चव्हाण?

रवींद्र चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे सक्रिय नेते आहेत. 2007 मध्ये ते पहिल्यांदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. नंतर 2009 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि आमदार झाले. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. पुढे ते आमदार असताना कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल महापालिकांमध्ये भाजपने वर्चस्व मिळवले होते. 


सम्बन्धित सामग्री